मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /औरंगाबादला पावसाने झोडपले, वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, 1 गंभीर जखमी

औरंगाबादला पावसाने झोडपले, वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, 1 गंभीर जखमी

विरगाव पुलावर पाणी आल्याने 2 मोटारसायकलस्वार पुलावरून वाहून गेले होते. मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवले आहे.

विरगाव पुलावर पाणी आल्याने 2 मोटारसायकलस्वार पुलावरून वाहून गेले होते. मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवले आहे.

विरगाव पुलावर पाणी आल्याने 2 मोटारसायकलस्वार पुलावरून वाहून गेले होते. मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवले आहे.

औरंगाबाद, 10 जून :  कोकणात (Kokan) आणि मुंबईत (Mumbai) पावसाने धुमशान घातले आहे. तर दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून फुलंब्री तालुक्यात वीज कोसळल्याने (lightning strike) एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. वीज पडल्याने 10 शेळ्या तर 2 गायी दगावला आहेत.

मराठवाड्यातही मान्सूनचे आगमन झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक गाव शिवारात पावसाचे पाणी आले होते. फुलंब्री तालुक्यात वीज कोसळल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. तर याच तालुक्यात वीज पडल्याने 10 शेळ्या तर 2 गायी दगावला आहेत.

कृषिमंत्री दादा भुसेंचा दणका, रुग्णांना लुबडणाऱ्या 2 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल

फुलंब्री तालुक्यातील विरगाव पुलावर पाणी आल्याने 2 मोटारसायकलस्वार पुलावरून वाहून गेले होते. मात्र त्यांना गावकऱ्यांनी वाचवले आहे.

मालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर

गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात मोठा पाऊस झाला नसला तरी अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. दिवसभर ढगाळ वातावरण असते आणि सायंकाळी 4 वाजेनंतर थोड्या वेळासाठी का होईना चांगला पाऊस गेल्या 3 दिवसांपासून पडतोय. आजही ढगाळ वातावरण आहे सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Aurangabad News