'आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब, निष्ठावान सेवक', सामानातून मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त केली चिंता

गृहखात्यातच मुख्यमंत्र्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असेल तर कसं व्हायचं!

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2018 08:35 AM IST

'आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब, निष्ठावान सेवक', सामानातून मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त केली चिंता

मुंबई, 27 जून : आजच्या सामना या आग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर कारवाई झाली आणि ही फडणवीसविरोधी गटाची चाल असल्याच्या बातम्या आता प्रसिद्ध झाल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. असं सामनातून लिहण्यात आलं आहे.

हेही वाचा...

महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे

गृहखात्यातच मुख्यमंत्र्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असेल तर कसं व्हायचं! गृहखात्यातील मुख्यमंत्रीविरोधी घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे? यावर दानवे, शेलार, खडसे, गडकरी वगैरे मंडळींनी तत्काळ झोत टाकायला हवा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात लिहण्यात आलं आहे की,

Loading...

'मुख्यमंत्र्यांची 'बूंद से गयी वो हौद से नहीं आती' हे सिद्ध झाले आहे. '२६/११'च्या हल्ल्याच्या वेळी 'कसाब' घुसला तेव्हा गृहखात्याचे धिंडवडे निघाले. आता 'मराठे' अटक प्रकरणात गृहखात्याचे पुन्हा तसेच धिंडवडे निघत आहेत.

आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात जात असल्याने त्यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतलेला दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या आसपास अलीकडे संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली दिसत आहेत.'

हेही वाचा...

आदेशाच पालन करा, नाहीतर...! 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं

भाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या

क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी

VIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 08:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...