आदेशाच पालन करा, नाहीतर...! 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं

आदेशाच पालन करा, नाहीतर...! 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं

या वर्षी होणाऱ्या सण-उत्सवांदरम्यान ध्वनी प्रदूषण झाल्यास संबंधित महानगरपालिकांची अजिबात गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद हायकोर्टानं दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून : ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टानं राज्यभरातील महानगरपालिकांना दिलेल्या आदेशांचं पालन करा नाहीतर कारवाईला तयार राहा असा इशाराच दिलाय. या वर्षी होणाऱ्या सण-उत्सवांदरम्यान ध्वनी प्रदूषण झाल्यास संबंधित महानगरपालिकांची अजिबात गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद हायकोर्टानं दिली आहे.

ध्वनी प्रदूषण करणा-यांविरोधात कारवाई केली गेली नाही तर संबंधित मनपा आयुक्तांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा कोर्टाने दिला आहे.

हेही वाचा...

झारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद

पंतप्रधान दहशतवाद्यांचं सर्वात मोठं टार्गेट,गृहमंत्रालयाचा पु्न्हा अलर्ट

वाढत्या ध्वनीप्रदुषणावर आवाज फाऊंडेशन आणि ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हा इशारा दिला आहे.

त्याबरोबरच माहिम, चर्चगेट आणि कफ परेड इथं होत असलेल्या मेट्रोच्या कामात होणाऱ्या प्रदुषणाबद्दलचा अहवाल पुढील सुनावणी दरम्यान देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.

पण या सगळ्यात गंभीर म्हणजे ध्वनी प्रदूषणाची तक्रार करण्यासाठी देण्यात आलेले २ हेल्पलाईन नंबर सुरु नसल्याची तक्रारही याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे केली आहे.

महापालिकेच्या या हलगर्जीपणावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत लोकांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

हेही वाचा...

भाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या

क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी

VIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार!

आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी

First published: June 27, 2018, 7:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading