गोविंद वाकडे,आळंदी,ता.26 जून : आळंदी नगर परिषदेचे भाजप नगर सेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही हत्या पूर्व वैमानस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. बालाजी कांबळे हे आपल्या दुचाकी वरुन भोसरीहून आळंदीला येत होते. त्याच दरम्यान त्यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. यामध्ये कांबळे गंभीर जखमी झाले.
विमानातच पायलटला आला हार्टअॅटॅक, तरीही केलं सेफ लँडींग
‘काँग्रेसची मानसिकता कधी सुधारणार?’
त्यांना उपचारासाठी तात्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुपारी 4 च्या सुमारास ही घटना घडल्यानं आळंदीत खळबळ उडाली आहे. या घटनेनं आळंदीत तणावही निर्माण झाला. वारीला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. लाखो वारकरी आळंदीत येणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर आळंदीत भरदिवसा नगरसेवकाची हत्या झाल्यानं पोलीसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. बालाजी कांबळे बांधकाम व्यावसायिक होते.
निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी - राज ठाकरे
मला टार्गेट केलं जातय, विजय मल्ल्याच्या उलट्या बोंबा
डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून. दिघी पोलीस तपास करीत आहेत.