मुंबई, 22 मार्च : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लिहिलेल्या पत्राची चिरफाड करत शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहे. शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्वीट करून थेट पवारांना सवाल विचारला आहे.
नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये केलेले आरोप खोटे असल्याचे पवारांनी वाचून दाखवले. ही पत्रकार सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 तारखेचे एक ट्वीट रिट्वीट करून पवारांना सवाल विचारला.
Shri Sharad Pawar ji said, from 15th to 27th February HM Anil Deshmukh was in home quarantine. But actually along with security guards & media he was seen taking press conference! https://t.co/r09U8MZW2m
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
'15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?' असा सवाल फडणवीसांनी केला.
त्यानंतर फडणवीस यांनी आणखी एक ट्वीट केले.
It seems Sharad Pawar ji is not briefed properly on Parambir Singh letter. In this lefter only, the SMS evidence shows that the meeting date was mentioned as end of February. Now who is diverting issue? pic.twitter.com/CTHzQ7meZO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
'परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे.आता नेमके कोण दिशाभूल करते आहे? असा सवाल करत पवारांवर पलटवार केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
'अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे जे पत्र लिहिले होते. त्यामुळे सचिन वाझेंना भेटायला बोलावलं असा दावा करण्यात आला आहे. पण त्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला देशमुख हे रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाइन होते. त्याच दिवशी ते वाझे यांना भेटले असल्याचा दावा करण्यात आला होता. जेव्हा चौकशी होईल तेव्हा सत्य बाहेर येईल, असं पवार स्पष्ट केले.
रिप्ड जिन्सच्या विधानामुळे चर्चेत असलेले मुख्यमंत्री तीरथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह
जे काही आरोप झाले त्यामध्ये मुख्य प्रकरण काय आहे. कोणाच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्यात आले हे प्रकरण आहे. माजी पोलीस आयुक्ताला हे सर्व माहीत होते तर एक महिने का शांत होते, मायकल रोडवर स्फोटकं कुणी ठेवली, मनसुख हिरेन यांची हत्या कुणी केली, याचा तपास झाला पाहिजे. या सर्व चौकशीला विचलित करण्यासाठी हे सर्व प्रकार विरोधक करीत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, NCP, Paramvir sing, Sharad pawar, Uddhav thackeray, Write a letter, शरद पवार