भाजपला पडणार मोठं खिंडार, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीने रचला इनकमिंगचा प्लान

भाजपला पडणार मोठं खिंडार, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीने रचला इनकमिंगचा प्लान

भाजपला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक नगरसेवकांच्या संपर्कात आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बैठका सुरू आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 30 जानेवारी : नवी मुबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला खिंडार पडणार असल्याची माहिती आहे. कारण भाजपचे मातब्बर नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता जात भाजपचा झेंडा फडकला. पण आता भाजपचे 15 नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये गेलेले 15 नगरसेवक घरवापसी करणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून नवी मुंबई भाजपला खिंडार पाडण्याच्या तयरीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक बडे नेते हे भाजपच्या 15 नगरसेवकांच्या संपर्कात आहे. सातत्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे ऐन महापालिकेच्या निवडणुकांआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - जितेंद्र आव्हाडांच्या इंदिरा गांधी टीकेवर वाद पेटला, अशोक चव्हाण भडकले

भाजपचे 15 नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात भाजपच्या नगरसेवकांचा प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर नवी मुंबईमध्ये पालिकेची स्थापना झाल्यापासून गणेश नाईकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्याकडून सत्ता काढून घेणं तसं सोप नसलं तरी अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये नाराज आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे.

भाजपला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक नगरसेवकांच्या संपर्कात आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बैठका सुरू आहे. त्यात त्यांना यश येतानादेखील दिसत आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर तर 15 नगरसेवकांवरून हा आकडा वाढण्याचीदेखील शक्यता आहे.

इतर बातम्या - हटके नंबर प्लेट असलेल्या ‘खानसाहब’ची पुणे पोलिसांनी उतरवली मस्ती, ट्वीट VIRAL

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गणेश नाईकदेखील नगरसेवकांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे यात आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला यश येतं की गणेश नाईक पुन्हा किंगमेकर ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

First published: January 30, 2020, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading