हटके नंबर प्लेट असलेल्या ‘खानसाहब’ची पुणे पोलिसांनी उतरवली मस्ती, ट्वीट होतंय भन्नाट व्हायरल

हटके नंबर प्लेट असलेल्या ‘खानसाहब’ची पुणे पोलिसांनी उतरवली मस्ती, ट्वीट होतंय भन्नाट व्हायरल

हेल्मेट न घातलेल्या नवाबचा पोलिसांनी पुणेरी स्टाईलने उतरवला माज.

  • Share this:

पुणे, 30 जानेवारी : पुणेरी स्टाईल आणि भाषा जरी जगभरात चर्चेत असते, तसेच पुणे पोलिसांचे ट्वीटही चर्चेत असते. पुणे पोलिसांच्या मजेशीर ट्वीट व्हायरल तर होत असतातच त्याचबरोबर त्यात एक संदेशही दिला जातो. असाच एक पुणेरी स्टाईल ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पुणे पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या ‘खान साहब’च्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्कारी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यासही सांगितले.

ट्विटरवर एका युझरने पुणे पोलिसांनी टॅग कर हेल्मेट न घातलेल्या मुलाचा फोटो पोस्ट केला. यावर पुणे पोलिसांनी, 'खान साहबलाही कूलही व्हायचे आहे, हेअर स्टाईलपण दाखवायची आहे, हिरोसारखी बाईकही चालवायची आहे, पण खान साहबला वाहतुकीचे नियम पाळायचे नाहीत, असं कसं चालेल?’, अशी मजेशीर कमेंट केली.

वाचा-CAA विरोधात भडकाऊ भाषण करणारे डॉ कफील खान पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतून केली अटक

वाचा-कोरोना विषाणूमुळे Health Emergency, WHO ने बोलावली आपात्कालिन बैठक

हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विविध मिम्स आणि कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने यावर, 'मला हसू आवरता येत नाही आहे. कितीचा दंड भरावा लागला याला?, हे देखील ट्वीट करायला हवे होते. गरीब नवाब संपूर्ण नवाबी होत होतe आणि आता त्याची नवाबगिरी एका फोटोन निघाली बाहेर’, अशी कमेंट केली.

वाचा-केंद्र सरकार देणार बेस्टला 300 बसेस, असा आहे प्रस्ताव!

पुणे पोलिसांच्या या ट्विटला आतापर्यंत बर्‍याच लाईक्स आणि 2 हजाराहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी पुणे पोलिसांच्या या ट्विटचे कौतुकही केले.

First published: January 30, 2020, 9:12 AM IST

ताज्या बातम्या