मुंबई, 26 जून : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे (shivsena) आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnik) यांच्या पत्रामुळे शिवसेनेत खळबळ उडाली होती. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरनाईक यांच्याबद्दल निर्णय घेतला असून लवकरच बातमी कळेल, असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी भेट घेतली. दुपारी 12.30 ते 2.30 पर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भाजपची जुळवून घ्या, असं पत्र लिहिणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली.
'प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली, त्यांनी त्यांची भावना या पत्रात व्यक्त केली. सरनाईक हे आजन्म ते शिवसेनेतच राहतील असं ते म्हणाले. मी हे साहेबांनाही सांगितलंय. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात लवकरच तुम्हाला एक बातमी मिळेल' असं राऊत म्हणाले.
5 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याची शिक्षा, लग्नानंतर नवरदेवाची थेट तुरुंगात पाठवणी
'शिवसेना पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण माझी आज चर्चा ही आमच्या पक्षप्रमुखांशी झाली. संघटनात्मक गोष्टींवर चर्चा झाली. पक्ष मजबूत असेल तर सरकार अधिक काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. संघटनेचे कामं करणं गरजेचं आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू होतंय , त्या संर्भात मुख्यमंत्र्याचं त्यावर काम सुरू आहे' असं राऊत यांनी सांगितलं.
आज पक्षप्रमुखांची भेट घेतली चर्चा झाली. बाहेर चर्चा व्हावी असं विशेष काही नाही. सगळं स्थिर स्थावर आहे. महाराष्ट्राच्या विकासाविरोधात कोणी काहीही ढोल बडवले, तरी हे राज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्यांचा कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण होईल. पवारांचा राजकीय मेसेज एवढाच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तम काम करत आहे. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतेय. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल' असंही राऊत म्हणाले.
'आज आम्ही nda त नाही आणि upa मध्ये सु्द्धा नाही. यावर राष्ट्रीय स्तरावर एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचा दिसतोय, त्यामुळे जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना विरोधी पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार साहेबांची भूमिका काही असेल , तर ती योग्य आहे' असंही राऊत म्हणाले.
Facebook वर नको असलेल्या कंमेट्स अशा करा कंट्रोल, जाणून घ्या सोपी प्रोसेस
'कोणी म्हटलं तिसरी आघाडी स्थापन होतेय? एक भक्कम आघाडी पर्याय म्हणून उभी राहत असेल तर आमचे प्रमुख निर्णय घेतील.' असंही राऊत म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी कुणाला भेटावं, हा त्यांचा प्रश्न आहे. पवार साहेबांनी कोणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे. पवार साहेब कोणाची भेट घेत असतील तर आपण त्यावर सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं, असंही राऊत म्हणाले.
अनिल देशमुख प्रकणावर आमचं लक्ष त्यावर आहे. काही गोष्टीत केंद्रीय तपास यंत्रणा जाणून बुजून अधिक ओढाताण करत आहे, असं व्हायला नको.' असं म्हणत राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.