Home /News /national /

5 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याची मिळाली शिक्षा, हनिमूनला जाण्यापूर्वीच नवरदेवाची थेट तुरुंगात पाठवणी

5 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याची मिळाली शिक्षा, हनिमूनला जाण्यापूर्वीच नवरदेवाची थेट तुरुंगात पाठवणी

हनिमून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

    सतना, 26 जून : लग्न (Marriage) ही प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची बाब असते. ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्यभराची गाठ बांधली त्याने आपल्याला कायम पाठिंबा द्यावा, हीच अपेक्षा असते. मात्र लग्नानंतर हाच मुलगा बलात्कारी असल्याचं कळलं तर नवरीचं काय होईल, याचा विचारही आपण करू शकत नाही. असाच प्रकार सतना येथे घडला आहे. हनिमून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. लग्नानंतर तो नवरीला घेऊन घरी जात होता. तेव्हा रस्त्यात पोलिसांनी त्याची गाडी रोखली. पोलिसांनी नवरदेवाला अटक केलं आणि नवरी, वऱ्हाड्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलीस ठाण्यात सर्वांना नवरदेवाने केलेला गुन्हा सांगितलं. हे एकून नवरीच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर मात्र पोलिसांनी सर्वांना घरी पाठवलं आणि नवरदेवाला तुरुंगात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन सिंह (28) याच्याविरोधात 2016 मध्ये दुष्कर्माचं प्रकरण नोंदविण्यात आलं होतं. बरेच प्रयत्न करून आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी 1000 रुपयांचं बक्षीस घोषीत केलं. तो गेली 5 वर्षे पोलिसांची फसवणूक करीत होता. 23 जून रोजी सतना येथील रामनगर भागात एका गावात आरोपीच्या नातेवाईकांनी दुसऱ्या एका मुलीसोबत त्याचं लग्न ठरवलं. त्यानुसार गुरुवारी लग्न करून तो आपल्या पत्नीसोबत घरी जात होता. नेमक्या याच वेळी पोलिसांनी त्याला पकडलं. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-पतीचा मोबाइल Switched off; शोधायला निघाली ती आणि हादरलीच... बदेरा बस स्टँडवरुन दुपारी पोलिसांनी पकडलं आरोपी नवरदेव नवरीला घेऊन गुरुवारी दुपारी बदेरा बस स्टँडच्या रस्त्याने कटमी सीमा भागात प्रवेश करणार होता, तेवढ्यात बदेरा पोलिसांना आरोपीबाबत खबर मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कार ऱोखली आणि त्याला थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. येथून थेट सिव्हील न्यायालयात घेऊन गेल्यानंतर त्याची तुरुंगात पाठवणी करण्यात आली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Marriage, Rape

    पुढील बातम्या