मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'पवारांच्या साथीने ममता दीदी काँग्रेसला बाजू ठेवून सत्तेची मोट बांधतायत', फडणवीसांनी साधला निशाणा

'पवारांच्या साथीने ममता दीदी काँग्रेसला बाजू ठेवून सत्तेची मोट बांधतायत', फडणवीसांनी साधला निशाणा

mamata banerjee meets sharad pawar

mamata banerjee meets sharad pawar

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याच्या येण्याने महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 2 डिसेंबर: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याच्या येण्याने महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे. ममता यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी ममता यांनी पत्रकारांना राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचे नाव न घेता कोणताही व्यक्ती काही करत नाही आणि परदेशात जाऊन बसतो, तर काम कसे चालेल? असा सवाल केला. ममतांच्या या खोचक प्रश्नानंतर महाविकासआघाडीत सर्वकाही अलबेल असल्याचे समजते. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हाच मुद्दा हाती घेत ममता यांच्यासह शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच फडणविसांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टोलेबाजी केली.

सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न 2019 मध्येही झाले. मात्र, लोकांनी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. आताही 2024 मध्ये असेच होणार असून पंतप्रधान मोदी यांचा विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

काँग्रेसशिवाय आघाडी तयार करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार यांची त्यांना साथ आहे. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून विरोधी पक्षांमध्येच सध्या अंतर्गत सामना सुरू आहे. त्यांच्यातील सामना संपल्यानंतर आमच्याशी कोण लढेल हे पाहू अशी टिप्पणीही फडणवीस यांनी केली.

तसेच, शरद पवार अंडरलाईन स्टेटमेंट करतायत की काँग्रेस सोडून नवी आघाडी करायची आहे. ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत आणि पवार साहेब बिटविन द लाईन बोलणारे आहेत. दोघांचे बोलणे एकच आहे. दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे आणि इतर विरोधी पक्षांना एकत्र आणायचं आहे. असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

ममतादीदी नॉर्थइस्ट आणि गोव्यात का लढत आहेत? कारण प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेस नसून आम्ही आहोत हे त्यांना दाखवायचं आहे. त्या सगळ्याला पवार साहेबांचं समर्थन आहे. त्यांचं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं आहे. मात्र, राज्यातली परिस्थिती त्यांना अनुकूल नाहीये. त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये. म्हणून ते काँग्रेसला सोबत घेत आहेत, अशी खोचक टिपणीदेखील फडणवीस यावेळी केली.

तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चर्तुवेदी यांनी सावरकरांबाबत केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचे बेगडी सावरकर प्रेम समोर आलं असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपला विजयी होण्याचा स्ट्राइक रेट पाहावा आणि महाराष्ट्रातून जनतेने कोणाला पळवून लावले हे निवडणुकीत दिसले. आता पुढील निवडणुकीतही दिसून येईल असेही फडणवीस यांनी म्हटले.

यासोबतच, भाजपावर टीका करणाऱ्या शिवसेनेवर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. “त्यांचे किती निवडून आले आहेत? ५६ निवडून आले आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट ४०-४२ टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा ७० टक्के होता. त्यामुळे कुणाला राज्यातल्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतून स्पष्ट झालंय, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होईल. संजय राऊत, शिवसेनेने कितीही लांगुलचालन केले, तरी त्यांना फायदा होणार नाही. पण एक चांगलंय. आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्वविरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं, हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Mamata banerjee, NCP, Pm modi, Rahul gandhi, Sanjay raut, काँग्रेस, शरद पवार