मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका'

'राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका'

'गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, तात्काळ विशेष सुरक्षा द्या' देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, तात्काळ विशेष सुरक्षा द्या' देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra fadnavis letter to CM uddhav Thackeray: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबई, 18 नोव्हेंबर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या (Gopichand Padalkar) जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूनं उभ राहिल्यानं यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis letter to CM Uddhav Thackeray)

एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे आणि या संपकरी कर्मचाऱ्यांच्यासोबत गोपीचंद पडळकर हे सुद्धा मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहेत. तसेच यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर पडळकरांच्या गाडीवर सोलापूर येथे दगडफेक करण्यात आली होती.

वाचा : बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांचा अखेर मृत्यू

फडणवीसांनी काय म्हटलंय पत्रात?

आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असतात तसेच बहुजनांच्या हक्काचे लढे लढत असतात. यामुळे दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ले करताना दिसून येत आहेत. तथा सत्तापक्षाशी संबधीत लोक हे हल्ले करताना दिसत आहेत.

लोकशाहीमध्ये विरोधकांचे आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही व लोकशाहीला अभिप्रेतही नाही. राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की, स्वपक्षीय असो की विरोधक ज्यांच्या जीवास धोका आहे त्यांना संरक्षण दिले पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

सातत्याच्या या घटनांमुळे गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका निर्माण झडाला असून, त्यांना राज्य सरकारतर्फे तातडीने सुरक्षा पुरविण्याची गरज आहे. त्यांच्या जीवीताचे काही वाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी राज्य सरकारची असणार आहे. गोपीचंद पडळकर यांना तातडीने विशेष सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

जून महिन्यात पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर जून महिन्यात दगडफेक झाली होती. गाडीवर दगड फेकल्याने गाडीची काच फुटून मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नव्हती. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला कऱण्यात आला होता.

वाचा : 'हा भाजपने घडवून आणलेला स्टंट' गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

या दगडफेकीच्या घटनेपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती. "शरद पवार हे मी लहान असल्यापासून ऐकतोय की ते पंतप्रधान होणार आहेत. मागील 30 वर्षांपासून ते भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्लीत हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असं झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात" अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली होती.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Gopichand padalkar, Uddhav thackeray