मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ST employees strike: बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांचा अखेर मृत्यू, निलंबनाच्या भीतीने केलेलं विष प्राशन

ST employees strike: बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांचा अखेर मृत्यू, निलंबनाच्या भीतीने केलेलं विष प्राशन

ST worker vishal ambarkar died: एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

ST worker vishal ambarkar died: एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

ST worker vishal ambarkar died: एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे प्रतिनिधी

बुलढाणा, 18 नोव्हेंबर : इतर एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपलेही निलंबन होईल या भीतीने संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर (ST worker Vishal Ambalkar) यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) आगारातील सहाय्यक तांत्रिक पदावर विशाल अंबलकर हे कार्यरत होते. (ST employee Vishal Ambalkar died)

विशाल अंबलकर यांनी निलंबनाच्या भीतीने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी 24 तासाच्या त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर सरकार 'अजून किती बळी घेणार ?' असा संतप्त सवाल आता विचारला जातोय.

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू अनेक एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील रहिवासी विशाल अंबलकार यांनी सुद्धा निलंबनाच्या भीतीपोटी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे अकोला येथे रेफर करण्यात आलं होतं. मात्र अकोल्यात उपचारा दरम्यान या एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी निलंबनाच्या भीतीनेच आपण आत्महत्या करत असल्याचं ते न्यूज 18 लोकमतशी बोलले होते.

वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

चित्रा वाघ यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसताना परिवहन महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे.

पत्रास कारण की... एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात चित्रा वाघ यांनी म्हटलं, "आपल्याला माहित आहे की, गेले 5 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत."

आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, "दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा."

First published:

Tags: Buldhana news, ST, Strike