जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'हा भाजपने घडवून आणलेला स्टंट' गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

'हा भाजपने घडवून आणलेला स्टंट' गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

'हा भाजपने घडवून आणलेला स्टंट' गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

NCP reaction on Gopichand Padalkar vehicle attack: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जून: भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञाताने दगड भिरकावला (Attack on BJP MLC Gopichand Padalkar). या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मड्डी वस्ती येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) विरोधात घोषणाबाजी केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं, जी घटना झाली ही कुठल्याही सन्माननीय सदस्याच्या गाडीवर होऊ नये, मात्र, हा भारतीय जनता पक्षाकडून घडवून आणलेला स्टंट आहे. अशा प्रकारचा स्टंट घडवून आणायचा आणि स्वत: प्रकाश झोतात यायचं. मग, सुरक्षेची मागणी करायची. शरद पवारांवर ज्या पातळीवर टीका करण्यात आली ती भाषा हलकटपणाची म्हणता येते. हलकटपणाची भाषा करुन टीका करणाऱ्यांनी पब्लिसिटी करणाऱ्या भाजपने शहानपणा शिकवू नये. सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

null

अमोल मिटकरी यांना पडळकरांचे प्रत्युत्तर यावर गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, महाराष्ट्रात सरकार त्यांचं आहे. पोलीस आहेत. याबाबत पोलीस निश्चितपणे याबाबत विचार करतील. मला स्टंटबाजी करण्याची गरज नाही. माझी जी भूमिका आहे ती तुमच्यासमोर मांडली आहे. यावर मला अधिक बोलायचं नाहीये. त्यांचं पोलीस प्रशासन आहे त्यांनी तपास करावा. पोलिसांच्या तपासात जे काही आहे ते महाराष्ट्राच्या समोर येईन.

null

शरद पवारांवर दुपारी केली होती टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. आज दुपारी सुद्धा शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार हे मी लहान असल्यापासून ऐकतोय की ते पंतप्रधान होणार आहेत. मागील 30 वर्षांपासून ते भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्लीत हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असं झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात