Home /News /maharashtra /

'रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात' पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका

'रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात' पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका

' काही जणांना वाटते की, कोबडं आरवल्याशिवाय उजाडत नाही. असेच काही कोंबडे दिल्लीत एकत्र जमले होते'

सोलापूर, 30 जून: भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. 'साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्ली हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असं झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात' अशी खोचक टीका पडळकरांनी केली. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी  तिसऱ्या आघाडीवरुन एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली. 'शरद पवार हे मी लहान असल्यापासून ऐकतोय की ते पंतप्रधान होणार आहे. मागील 30 वर्षांपासून ते भावी पंतप्रधान आहेत, त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत' असा टोला पडळकरांनी  लगावला.

अखेर नगरमध्ये भाजपची सत्ता गेली, महाविकास आघाडीचा फडकला पालिकेवर झेंडा

तसंच, 'साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. काही जणांना वाटते की, कोबडं आरवल्याशिवाय उजाडत नाही. असेच काही कोंबडे दिल्लीत एकत्र जमले होते. त्यामुळे याचं असं झालंय कि, रात गेली हिशेबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळे पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली. बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी पात्रतेपेक्षा जास्त भेटलं की असं होतं, असं म्हणत पडळकरांना संस्कार शिकवले होते. पडळकरांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं.

टीम इंडियानंतर आणखी एका टीमविरुद्ध बरसला कोहलीचा सहकारी, पण...

राज्यातील काही घराणे हे अतिसुसंस्कृत आहेत. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. तुमच्या विरोधात बोललो की लगेच असंस्कृतपणा दिसतो. त्यामुळे मला संस्कार शिकवण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर पडळकरांनी दिलं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Gopichand padalkar, Maharashtra, Mumbai, NCP, Sharad pawar

पुढील बातम्या