मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'शब्दांचं यमक यशाचं गमक होऊ शकत नाही' फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

'शब्दांचं यमक यशाचं गमक होऊ शकत नाही' फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

आधी माझे कुटुंब माझी जबबादारी आणि आता मी जबबादारी, मग सरकारची काहीच जबाबदारी नाही का?

आधी माझे कुटुंब माझी जबबादारी आणि आता मी जबबादारी, मग सरकारची काहीच जबाबदारी नाही का?

आधी माझे कुटुंब माझी जबबादारी आणि आता मी जबबादारी, मग सरकारची काहीच जबाबदारी नाही का?

मुंबई, 02 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (budget session maharashtra 2021) दुसऱ्या दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. 'शब्दांचं यमक यशाचं गमक होऊ शकत नाही' अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांना टोला लगावला. तसंच कोविडच्या काळात भष्ट्राचार झाल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

'राज्यपालांबद्दल कोण काय बोललं हे आम्ही ऐकलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपालांना विमान नाकारण्यात आले होते. राज्यपाल आणि सरकारमध्ये संघर्ष हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही.  राज्यपाल हे विमानात बसले होते. त्यानंतर परवानगी देण्यात आली नाही. विमानामध्ये इंधन कसे भरले होते, नेमके त्यांना ऐनवेळेवर तिकीट कसे देण्यात आले. राज्यपालांना विमान देण्याची परवानगी ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा असते. पण मनाचा कोतेपणा दाखवणे गरजेचं होतं, अशी टीका फडणवीस यांनी केली.

औरंगाबाद हादरलं, सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन

'राज्यपालांचं भाषण कोणत्या श्रेणीत मोडतं तर ते यशोगाथा नाही वेदना आणि व्यथा आहे. कोणतीही आकडेवारी नाही.चौकात भाषण करतो तसं भाषण राज्य सरकारने दिले होतं. आपल्या अपयशाचा लेखाजोखा मांडला जाईल, असं सरकारच्या लक्षात आलं होतं. कोरोनात किती कंत्राटदारांना मदत केली होती हे दिलं असतं तर बरं झालं असतं, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

'महात्मा फुले योजनेचा १० टक्के लोकांनाही फायदा झाला नाही. औरंगाबाद खंडपीठ यांची माहिती मागत आहे. आधी माझे कुटुंब माझी जबबादारी आणि आता मी जबबादारी, मग सरकारची काहीच जबाबदारी नाही का? सरकार हात झटकून उभे आहे,  सगळी जबाबदारी तुमची आणि बाकी केंद्राची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे', असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

'शब्दांच्या रत्नांनी लोकांची कामं होत नाही, यमक जुळवणारी भाषा ही यशाचे गमक असू शकत नाही', अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

'देशांतल्या 34 टक्के मृत्यू राज्यात झाले आहे.  WHO बद्दल संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्य सरकार हे डॉक्टरांचा सल्ला घेतो की कंपांडरचा, कशासाठी आपण आपली पाठ आपण थोपटून घेतोय? देशातले 46 टक्के रुग्ण राज्यात आहे.  कोरानाबाबत काय चाललंय काही कळत नाही. रुग्ण संख्या खरंच वाढली की अजून काही आहे हे कळत नाही.  अमरावतीत लोकांना विचारलं जातंय की अहवाल पॉझिटिव्ह हवाय की निगेटिव्ह ? कोणी मंत्री, अधिकारी जातात आणि लॉकडाऊन करतात. छोट्या व्यापाऱ्यांना काही मदत करणार आहात का? अमरावतीत का केलाय लॉकडाऊन?' असा सवालही फडणवीस यांनी विचारला.

लस घेऊनही जिल्हा आरोग्य अधिकारी COVID-19 पॉझिटिव्ह, बीडमध्ये उडाली खळबळ

'देशाचा आर्थिक पाहणी अहवाल 3 राज्यांचा एकत्रित अहवाल आला आहे. महाराष्ट्र, युपी बिहार राज्यात चांगली हाताळणी असती तर  9 लाख 55 कमी रुग्ण असते आणि 30 हजार मृत्यू कमी झाले असते. देशात कोरोनात आपण सगळ्यात मागे पण तरी देखील पाठ थोपटली जात आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

'कोरोना जम्बो केंद्रात विक्रमी भ्रष्टाचार झाला आहे.  १२०० चं थर्मामीटर ६ हजारांना विकत घेण्यात आले आहे. याबद्दल एक पुस्तकी तयार करण्यात आली आहे. हीच पुस्तकी मुख्यमंत्र्यांना देणार आहोत', असंही फडणवीस म्हणाले.

First published:

Tags: BJP, Budget 2021, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackery