बीड, 02 मार्च: सध्या देशभरात कोरोना लसीकरणाची (Coronavirus Vaccination Drive) मोहीम सुरू आहे. याअंतर्गत सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना लशीबाबत काहींच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. त्यातच अशा बातमी समोर येते आहे की, कोरोनाची लस घेऊनही बीड जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार (Dr. R. B. Pawar) यांनी कोरोना लस घेतल्या कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 18 व्या दिवशी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या त्यांची असून प्रकृती स्थीर आहे. (हे वाचा- शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खळबळ, 120 विद्यार्थी क्वारंटाइन ) राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बीडमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोनाला वेशीवर रोखण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्वाची होती. चेक पोस्ट तपासणी, कोरोनाच्या हॉटस्पॉट असणाऱ्या भागात जाऊन पाहणी करणे इत्यादी कामांमध्ये डॉ. पवारांचा पुढाकार होता. महिन्यापूर्वीच त्यांची एक कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण काल थोडा त्रास जाणवल्याने त्यांनी अँटीजन टेस्ट केली. यात पवार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (हे वाचा- Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर ‘या’ आजारांनाही देतेय टक्कर ) डॉ. पवार यांनी 12 फेब्रुवारीला जिल्हा रुग्णलयात लसीकरण केंद्रावर कोरोना लस (Corona Vaccine) घेतली होती. दुसरा डोस घेण्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना टेस्ट करावी आणि होम क्वारंटाइन राहावे असे आवाहन पवार यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.