जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद हादरलं, सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन

औरंगाबाद हादरलं, सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन

औरंगाबाद हादरलं, सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन

नेहमी हसत खेळत राहणारी संजीवनीने आत्महत्यासारखा टोकाचे पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले याचे कारण समोर आले नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

सचिन जिरे,प्रतिनिधी औरंगाबाद, 02 मार्च : आई वडील कामावर गेल्यावर  सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या (committed suicide) केल्याची घटना  सोमवारी रात्री आनंदनगर गारखेडा परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे वय-14 (रा.गल्ली क्र.4 आनंदनगर, गरखेडा परिसर) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संजीवनी ही इयत्ता 7 वीत शिकत होती. तिचे आई-वडील दोन्ही फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नित्यनेमाने आई वडील व लहाना भाऊ असे तिघेही फुटाणे विक्रीसाठी गेले होते. सर्वजण रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी आले असता. घराचा बाहेरील दरवाजा बंद होता. तर घरात संजीवनी नव्हती. तिला आवाज दिला असता ती दिसून न आल्याने शेजारी गेली असावी असे घरच्यांना वाटले. लस घेऊनही जिल्हा आरोग्य अधिकारी COVID-19 पॉझिटिव्ह, बीडमध्ये उडाली खळबळ मात्र, काही वेळा नंतर लहान भाऊ जेंव्हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेव्हा संजीवनीने साडीच्या साहाय्याने छताच्या लोखंडी अंगलला गळफास घेतल्याचे दिसले त्याने भेदरलेल्या अवस्थेत ही माहिती आई वडिलांना दिली. तेव्हा हा प्रकार समोर आला. Explained: म्युचअल फंड KYC अपडेट करायचं आहे? अशी आहे प्रक्रिया पोलिसांनी संजीवनीला फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविले मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. नेहमी हसत खेळत राहणारी संजीवनीने आत्महत्यासारखा टोकाचे पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले याचे कारण समोर आले नसून या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरिक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात