मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI ग्राहकांसाठी Alert! लवकर पूर्ण करा हे काम अन्यथा खात्यावर होईल परिणाम, पैसे अडकण्याची भीती

SBI ग्राहकांसाठी Alert! लवकर पूर्ण करा हे काम अन्यथा खात्यावर होईल परिणाम, पैसे अडकण्याची भीती

State Bank Of India ने ग्राहकांना नोटीस पाठवत 30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक (PAN-Aadhaar Link) करण्यास सांगितले आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

State Bank Of India ने ग्राहकांना नोटीस पाठवत 30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक (PAN-Aadhaar Link) करण्यास सांगितले आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

State Bank Of India ने ग्राहकांना नोटीस पाठवत 30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक (PAN-Aadhaar Link) करण्यास सांगितले आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एसबीआयने त्यांच्या 46 कोटी ग्राहकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. एसबीआयने त्यांच्या खातेधारकांना (SBI account holder) लवकरात लवकर त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक (PAN-Aadhaar card Link) करा. बँकेच्या मते, जर ग्राहकाने हे काम निश्चित सीमेपर्यंत पूर्ण नाही केले तर त्यांच्या बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो.

सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणं (PAN-Aadhaar linking) अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 सप्टेंबर आहे. अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील पॅन आणि आधार लवकरात लवकर लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या खातेधारकांची संख्या 46 कोटीवर पोहोचली आहे. या ग्राहकांनी पॅन-आधार लिंक केले नाही तर त्यांच्या बँकिंग सेवा बाधित होऊ शकतात.

हे वाचा-स्वस्तात सोनं खरेदीची संधी,Sovereign Gold Bondमध्ये गुंतवणूक करणं किती फायद्याचं

बँकेने अशी माहिती दिली आहे की, पॅन आधार लिंक करणं अनिवार्य आहे. असे न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि ट्रान्झॅक्शनसाठी कोट करता येणार नाही. तुम्ही www.incometax.gov.in वर भेट देऊन Link Aadhaar वर क्लिक करुन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याकरता डेडलाइन 30 सप्टेंबर आहे. कोणतीही असुविधा टाळण्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. पॅन आणि आधार कार्ड लिंक न झाल्यास डेडलाइननंतर तुमच्या चालू सेवा प्रभावित होऊ शकतात. तुमच्या खात्यावर याचा परिणाम होऊ शकतो.

ऑनलाइन करता येईल लिंक

तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरता इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा, त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल.

हे वाचा-Indian Railway नं तिकीट बुकिंगमध्ये केले मोठे बदल, वाचा सविस्तर

SMS च्या माध्यमातून करा पॅन-आधार लिंक

SMS च्या माध्यमातून पॅन-आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक<स्पेस>10 अंकी पॅन कार्ड क्रमांक टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकांवर पाठवावा लागेल.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Pan card, SBI, Sbi account, Sbi alert, SBI bank, SBI Bank News