जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indian Railway कडून रेल्वेच्या बुकिंग आणि कोच कोडमध्ये मोठे बदल, नव्या बदलानुसार तुम्हाला तिकीट बुक करताना मिळेल आवडीचे सीट

Indian Railway कडून रेल्वेच्या बुकिंग आणि कोच कोडमध्ये मोठे बदल, नव्या बदलानुसार तुम्हाला तिकीट बुक करताना मिळेल आवडीचे सीट

Indian Railway कडून रेल्वेच्या बुकिंग आणि कोच कोडमध्ये मोठे बदल, नव्या बदलानुसार तुम्हाला तिकीट बुक करताना मिळेल आवडीचे सीट

रेल्वेने हे बदल (New Booking and Coach Codes) प्रवाशांच्या सोयीसाठीच केले आहेत. यामुळे आता तुम्हाला तिकीट बुक करताना तुमच्या आवडीचे सीट आरामात मिळू शकणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट: तुम्ही रेल्वेने सतत प्रवास करत असाल, किंवा आता तसा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेने आता तिकिट बुक करण्याच्या पद्धतीत (Railway ticket booking) काही बदल केले आहेत. बुकिंग कोड आणि कोच कोड या दोन्हीमध्ये बदल (Booking and Coach codes changed) केल्यामुळे, आता तुम्हाला नवे कोड लक्षात ठेवावे लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला तिकीट मिळवण्यास अडचण येऊ शकते. रेल्वेने आपल्या गाड्यांमध्ये नव्या प्रकारचे कोच सुरू (New Coaoches in Railway) केल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत. रेल्वेने हे बदल (New Booking and Coach Codes) प्रवाशांच्या सोयीसाठीच केले आहेत. यामुळे आता तुम्हाला तिकीट बुक करताना तुमच्या आवडीचे सीट आरामात मिळू शकणार आहे. यासोबतच रेल्वेने देशभरातली कित्येक मार्गांवर व्हिस्टाडोम कोच (Vista Dome Coaches) असलेल्या गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळेही कोड सिस्टिममध्ये हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिस्टाडोम कोचसोबतच एसी-३ टायरच्या इकॉनॉमी क्लासचाही (AC 3 tier Economy Class Coach) समावेश करण्यात आला आहे. रेल्वेने सांगितले, की या कोचमध्ये सुमारे 83 बर्थ उपलब्ध असणार आहेत. थर्ड एसीच्या इकॉनॉमी कोचसाठी बुकिंग कोड 3E असणार आहे. तसेच, कोच कोड हा M असणार आहे. या बर्थसाठी किती रुपये तिकीट (Third AC Economy coach ticket) असेल हे मात्र अद्याप ठरवण्यात आले नाही. लवकरच याबाबत माहिती जाहीर केली जाईल असेही रेल्वेने स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवी योजना; मिळणार आणखी 2 हजार रुपयांची मदत

 काय आहे व्हिस्टाडोम कोच

व्हिस्टाडोम कोच (What is Vista Dome Coach) हे विशेष तयार करुन घेण्यात आलेले कोच आहेत. या डब्यांचे छत हे काचेचे असल्यामुळे यातून बाहेरचे दृश्य पाहता येणार आहे. त्यामुळे घाटातून जाताना आणि इतर ठिकाणीही मनमोहक दृष्यांचा आनंद आतील प्रवासी घेऊ शकणार आहेत. सध्या मुंबई ते गोव्यादरम्यान असणाऱ्या दादर-मडगाव (Vista Dome coach available on which route) मार्गावरील गाडीत हा व्हिस्टाडोम कोच उपलब्ध आहे. असे असतील नवे कोच आणि बुकिंग कोड्स व्हिस्टाडोम एसी कोचसाठी EV हा कोड असणार आहे. तसेच, व्हिस्टाडोमचा बुकिंग कोड V.S. असणार आहे, तर कोच कोड AC DV असा असणार आहे. स्लीपर कोचसाठी बुकिंग कोड S.L., तर कोच कोड S असणार आहे. एसी चेअरकारसाठी बुकिंग कोड C.C., आणि कोच कोड C असणार आहे. थर्ड एसीचा बुकिंग कोड 3A, तर कोच कोड B असणार आहे. सेकंड एसीचा बुकिंग कोड 2A, तर कोच कोड A असणार आहे.

Real Estate: स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी

 गरीब रथमधील एसी थ्री टायरचा बुकिंग कोड 3A, तर कोच कोड G असणार आहे. गरीब रथ चेअरकारचा बुकिंग कोड CC आणि कोच कोड J असणार आहे. फर्स्ट एसीचा बुकिंग कोड 1A आणि कोच कोड H असणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासचा बुकिंग कोड E.C, तर कोच कोड E असणार आहे. अनूभुती क्लासचा बुकिंग कोड E.A, आणि कोच कोड K असणार आहे. फर्स्ट क्लास कोचचा बुकिंग कोड F.C, तर कोच कोड F असणार आहे. व्हिस्टाडोम एसी चा कोच कोड E.V आणि बुकिंग कोडही E.V असणार आहे.

या नव्या कोडमुळे (Railway New Codes) तुमचा रेल्वे प्रवास जास्त सुलभ होणार असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात