नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : सोन्यामध्ये (Gold) गुंतवणूक (Investment) करायची असल्यास, गुंतवणुकदारांसाठी सॉव्हेरियन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) हा एक दिर्घकालीन आणि उत्तम पर्याय ठरु शकतो. आरबीआयने सोमवारी सॉव्हेरियन गोल्ड बाँडची 5 वी सीरिज (Sovereign Gold Bond V Series) नुकतीच ओपन केली आहे. यात डिजिटल (Digital) माध्यमातून पेमेंट (Payment) केल्यास गुंतवणुकदारांना डिस्काउंटदेखील दिला जाणार आहे. तसंच सहामाही पध्दतीने व्याज देखील मिळणार आहे. बाँड मॅच्युअर (Mature) झाल्यावर त्यावेळी सोन्याची किंमत जी असेल त्यानुसार गुंतवणुकदाराला पेमेंट दिलं जाईल. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा चांगला पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) सॉव्हेरियन गोल्ड बॉंण्डची 5 वी सीरिज सोमवारी खुली केली. यात गुंतवणूकदार 4790 रुपये प्रतिबाँड या दराने गुंतवणूक करू शकतात. यामध्ये प्रत्येक बाँड एक ग्रॅम सोन्याची किंमत ट्रॅक करेल. यासाठी डिजीटल माध्यमातून पेमेंट केल्यास 50 रुपयांचा डिस्काउंटदेखील दिला जाणार आहे. गुंतवणुकदारांना यातून वार्षिक 2.5 टक्के व्याज (Interest) मिळेल आणि ते सहामाही पध्दतीने दिलं जाईल. या बाँडचं लिस्टिंग स्टॉक एक्सचेंजवर करण्यात येईल. बाँड मॅच्युरिटीवेळी सोन्याचा त्यावेळी जो दर असेल त्यानुसार आरबीआय पेमेंट देईल.
याबाबत अर्थमित्र फायनान्शियल सर्व्हिसेसचे सर्टिफाइड फायनेशियल प्लॅनर रवींद्र देशमुख यांनी सांगितलं, की दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांकरता SGB हा चांगला पर्याय आहे. कारण त्यांना मॅच्युरिटीपर्यंत हा बाँड ठेवल्यास व्याज आणि भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. SGB चा कार्यकाळ हा 8 वर्षांचा असतो आणि गुंतवणुकदारांना 5 वर्षांनंतर व्याज भरण्याच्या तारखेला बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आणि गोल्ड फंड ऑफ फंड्स हे डिजीटल माध्यमातून सोनं खरेदी करण्याचे अन्य पर्याय उपलब्ध आहेत, परंतु यात वर्षाला सुमारे अर्धा टक्का गुंतवणूक शुल्क द्यावं लागतं. Sovereign Gold Bond साठी असं कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही. गोल्ड म्युचअल फंडाच्या तुलनेत हा अधिक फायदेशीर आणि आकर्षक असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold bond, Gold prices today, Sovereign gold bond scheme