व्याजदरात कपात तर आणखी 3 महिने EMI देण्यासाठी सूट, लॉकडाऊनमध्ये RBI च्या 6 मोठ्या घोषणा

व्याजदरात कपात तर आणखी 3 महिने EMI देण्यासाठी सूट, लॉकडाऊनमध्ये RBI च्या 6 मोठ्या घोषणा

सध्या देशाची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बिकट बनली आहे. सामान्यांना दिलासा देण्यासाठी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. त्यापैकी सर्व प्रकारच्या मुदत कर्जावरील EMI वर आणखी 3 महिन्यासाठी सूट ही एक महत्त्वाची घोषणा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मे : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (RBI Governor Shaktikant  Das) यांनी पत्रकार परिषद घेऊन सामान्यांना दिलासा देणाऱ्या काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सर्व प्रकारच्या मुदत कर्जावर ऑगस्टपर्येत सूट अर्थात EMI Moratorium आणखी तीन महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्के म्हणजेच 40 बेसिस पॉईंट्सने कपात केली आहे. त्यामुळे कर्जावरील EMI कमी होणार आहे. आरबीआयने रिव्हर्स रेपो रेट देखील 3.75 टक्क्यावरून 3.35 टक्के केला आहे. जाणून घेऊयात आरबीआयने केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

1. मोरटोरियमबाबत मोठा निर्णय : RBI ने मुदत कर्जावरील मोरटोरियम सुविधा आणखी 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईएमआय भरण्यासाठी देण्यात आलेली सूट 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच मोरटोरियम कालावधी एकूण 6 महिन्याचा झाला आहे. मोरटोरियम कालावधीतील व्याज 31 मार्च 2021 पर्यंत भरता येईल.

(हे वाचा-RBI ने केली रेपो रेटमध्ये कपात, आता सर्व कर्जावरील EMI होणार स्वस्त)

2. व्याजदरात कपात : आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांनी कमी करत 4 टक्क्यांवर आणला आहे. गव्हर्नर यांनी माहिती दिली की, MPC बेठकीत 6-5 सदस्यांनी व्याजदर घटवण्याबाबत सहमती दर्शवली होती. या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जासहित सर्व प्रकारच्या कर्जावरील EMI स्वस्त होईल. याआधी मार्चमध्ये देखील रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांनी कपात केली होती.

3. व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा : सिडबीला 15000 कोटी रुपयांचा वापर करण्यासाठी 90 दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळेल. एक्सपोर्ट क्रेडिटचा कालावधी 12 महिन्यांवरून 15 महिने करण्यात येणार आहे. EXIM Bank ला यूएस डॉलर स्वॅपसाठी 90 दिवसांसाठी 15,000 कोटी कर्ज देण्यात येईल.

4. जीडीपी ग्रोथमधील घसरण चिंतेचे कारण : दास म्हणाले की या आर्थिक वर्षात जीडीपी ग्रोथ नकारात्मक राहील. जगभरातील अनेक एजन्सींनी अशी घोषणा केली आहे.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये 'या' क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान, सरकारने दिली माहिती)

5. महागाई वाढण्याची शक्यता : लॉकडाऊनमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. धान्याचा पुरवठा एफसीआय कडून वाढवला गेला पाहिजे. देशात रबी पीक चांगलं आलं आहे. यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. सध्या मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण बिघडल्याने अर्थव्यवस्था थांबली आहे. सरकार आणि आरबीआयने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम सप्टेंबर नंतर दिसण्यास सुरूवात होईल.

6. देशातील महत्त्वाची राज्ये कोरोना संक्रमित : जागतिक मंदीचे सावट आहे, त्यात देशातील टॉपची 6 राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव आहे. यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 60 टक्के हिस्सा आहे. याठिकाणी अधिक परिसर रेड किंवा ऑरेंज झोनमध्ये आहेत.

याआधी केलेल्या घोषणा

27 मार्च रोजी कोरोनामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तीन महिन्यांपासून EMI न भरल्याबद्दल सामान्य लोकांना सूट देण्यात आली होती. बँक आणि वित्तीय संस्थांना मुदतीच्या कर्जाची EMI वसुली तीन महिन्यांकरिता पुढे ढकलण्याची मुभा दिली. त्याचप्रमाणे 12 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषदेत अनेक घोषणा केल्या, त्यामध्ये एमएसएमईंना तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव होता.

First published: May 22, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading