नवी दिल्ली, 21 मे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister of India Rajnath Singh) यांनी गुरूवारी अशी माहिती दिली आहे की, लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त परिणाम मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर (Manufacturing Sector) झाला आहे. त्याचप्रमाणे सप्लाय चेन सुद्धा खूप वाईट पद्धतीन प्रभावित झाली आहे. त्यामुळे संरक्षण सेक्टरवर परिणाम होणे निश्चित आहे. संरक्षण सेक्टरला इतर क्षेत्रांच्या तुलनेत अधिक दबाव सहन करावा लागेल.
Manufacturing sector has been the most affected by lockdown and disruption in existing supply chains, defence sector is no exception. Defence sector has faced more pressure compared to other sectors: Defence Minister Rajnath Singh #COVID19 pic.twitter.com/NWAU2sLa7r
— ANI (@ANI) May 21, 2020
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घसरण लॉकडाऊनमुळे औद्योगिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यातील भारतातील मॅन्युफॅक्चरिंग व्यवहार सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले आहेत. सोमवारी जारी करण्यात आलेल्या निक्केई आयएचएस मार्केट सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. एप्रिल महिन्यासाठी आयएचएस मार्केटद्वारे जारी करण्यात येणारे परचेंजिंग मॅनेजिंग इन्डेक्स घसरून केवळ 27.4 राहिली आहे. आयएचएस मार्केट प्रत्येक महिन्याला मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमधील आकडे जारी करते. हा अंक 50 पेक्षा जास्त असल्यास वृद्धी आणि त्यापेक्षा खाली असल्यास घसरण दर्शवतो. हा आकडा 50 वर असल्यास स्थिरता असते, म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग व्यवहारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. (हे वाचा- सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर ) मूडीज इन्वेस्टर्स सर्विसने त्यांच्या एका अहवालात म्हटले आहे की, भारताला लॉकडाऊनमुळे मोठ्या घसरणीचा सामना करावा लागेल. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये वृद्धी शुन्यावर राहू शकते. मात्र 2022 मध्ये भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे. मूडीजच्या अहवालात असे देखील नमूद करण्यात आले आहे की 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी ग्रोथ 6.6 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. असं झाल्यास भारताला मंदीच्या संकटातून बाहेर पडण्यास मोठी मदत होईल.