Home /News /money /

RBI ने केली रेपो रेटमध्ये कपात, आता सर्व कर्जावरील EMI होणार स्वस्त

RBI ने केली रेपो रेटमध्ये कपात, आता सर्व कर्जावरील EMI होणार स्वस्त

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. दास यांनी केलेली महत्त्वाची घोषणा म्हणजे रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.40 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 22 मे : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी सामान्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. दास यांनी केलेली महत्त्वाची घोषणा म्हणजे रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.40 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी आरबीआयने कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक सवलती जाहीर केल्या. रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. त्यानंतर रिव्हर्स रेपो दर 4% वरून 3.75% पर्यंत खाली आला. रिव्हर्स रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांना फायदा होईल. बँकांना कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर रेपो रेट 4.4 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के असणार आहे. त्याचप्रमाणे ते असही म्हणाले की महागाई दरही 4 टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. (हे वाचा-कोरोनाच्या संकटात ही कंपनी देणार बोनस, 15000 फ्रेशर्संना नोकरीची ऑफर) आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, कोव्हिड 19 ने अर्थव्यवस्था पांगळी केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती आरबीआय गव्हर्नर देत आहेत. भारतात रोगाचा सामना करण्याचे सामर्थ्य आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. शक्तिकांत दास म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा देखील महसुलावर परिणाम झाला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा -सर्व प्रकारच्या मुदत कर्जांवरील मोरटोरियम आणखी तीन महिन्यासाठी वाढवला. ईएमआय भरण्यासाठी देण्यात आलेली सूट 1 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे -आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांनी कमी करत 4 टक्के केला आहे. याआधी मार्चमध्ये रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. -सिडबीला 15000 कोटी रुपयांचा वापर करण्यासाठी 90 दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळेल. एक्सपोर्ट क्रेडिटचा कालावधी 12 महिन्यांवरून 15 महिने करण्यात येणार आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Rbi

    पुढील बातम्या