• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • आता बँक अधिकाऱ्यांची काही खैर नाही... ATM आणि बँकिंग सर्व्हिसमध्ये समस्या आल्यास इथे करा तक्रार, त्वरित घेतली जाणार अ‍ॅक्शन

आता बँक अधिकाऱ्यांची काही खैर नाही... ATM आणि बँकिंग सर्व्हिसमध्ये समस्या आल्यास इथे करा तक्रार, त्वरित घेतली जाणार अ‍ॅक्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi Launched RBI schemes) आज एका व्हर्च्युअल बैठकीत 'RBI रिटेल डायरेक्ट स्कीम' (RBI retail direct scheme) आणि इंटीग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीम (RBI Integrated Ombudsman Scheme) लाँच केल्या आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi Launched RBI schemes) आज एका व्हर्च्युअल बैठकीत 'RBI रिटेल डायरेक्ट स्कीम' (RBI retail direct scheme) आणि इंटीग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीम (RBI Integrated Ombudsman Scheme) लाँच केल्या आहेत. आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट योजनेमुळे सरकारी सिक्युरिटीजमध्ये किरकोळ सहभाग वाढेल, तर इंटीग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीमचा उद्देश तक्रार निवारण प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करणे हा आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की, आज लाँच झालेल्या योजना- RBI Retail Direct Scheme आणि RBI Integrated Ombudsman Scheme यामुळे देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल आणि कॅपिटल मार्केट गुंतवणूकदारांसाठी सोपे आणि सुरक्षित बनेल. भारतातील सर्व सरकारी सिक्युरिटीजना सुरक्षेची हमी असते, त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर सुरक्षिततेची खात्री दिली जाईल.' हे वाचा-Work from Home मध्ये शिफ्ट संपल्यानंतर कर्मचाऱ्याला फोन केल्यास भरावा लागणार दंड बँकिंग ग्राहकांना दिलासा इंटीग्रेटेड ओम्बड्समॅन स्कीमअंतर्गत बँकिंग ग्राहकांच्या तक्रारी सोडवता येतील. RBI द्वारे नियमन केलेल्या संस्थांविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक उत्तम प्रणाली प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. ही योजना वन नेशन-वन ओम्बड्समनवर या तत्त्वावर आधारित आहे. यामध्ये ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी एक पोर्टल, एक ईमेल आणि एक पत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी, कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळेल. तक्रारी सोडवण्यासाठी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी अनेक भाषांमध्ये एक टोल फ्री नंबर देखील मिळेल. त्यामुळे बँकिंग संदर्भातील, एटीएमबाबतची कोणतीही तक्रार तुम्ही यावर करू शकता. हे वाचा-PM मोदींनी लाँच केल्या RBI च्या दोन खास योजना, सामान्यांना थेट होणार फायदा गिल्ट खाते बचत खात्याशी जोडले जाईल यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'गव्हर्नमेंट सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निधी व्यवस्थापकांची गरज भासणार नाही. गुंतवणूकदार थेट गिल्ट खाते उघडू शकतात. हे खाते बचत खात्याशीही जोडले जाईल.' लोकांसाठी ही प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याचंही ते म्हणाले.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: