नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi Launched RBI schemes) आज एका व्हर्च्युअल बैठकीत 'RBI रिटेल डायरेक्ट स्कीम' (RBI retail direct scheme) लाँच केली. ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी बाँड ऑनलाइन खरेदी आणि विक्री करण्यास अनुमती देते. याशिवाय एकात्मिक लोकपाल योजना (RBI Integrated Ombudsman Scheme) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूव लाँच करण्यात आली. याद्वारे तक्रारींचे निवारण करण्यासाठी आरबीआयला नियम बनवता येणार आहेत. यामध्ये एक मेल, पोर्टल आणि पत्त्याद्वारे तक्रार दाखल करता येईल.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) या योजनांच्या लाँचवेळी उपस्थित होते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने फेब्रुवारी 2021 च्या आर्थिक धोरणात ही योजना जाहीर केली होती.
The two schemes- the RBI Retail Direct Scheme and the Reserve Bank- Integrated Ombudsman Scheme- launched today will expand the scope of investment in the country and make access to capital markets easier and more secure for investors: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/ajXfnYDFHV
— ANI (@ANI) November 12, 2021
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की, आज लाँच झालेल्या योजना- RBI Retail Direct Scheme आणि RBI Integrated Ombudsman Scheme यामुळे देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल आणि कॅपिटल मार्केट गुंतवणूकदारांसाठी सोपे आणि सुरक्षित बनेल.
हे वाचा-8 रुपयांचा शेअर पोहोचला ₹1090 वर, 1 लाखांचे बनले 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त!
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट योजनेमुळे देशातील लहान गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम मिळाले आहे. रिझर्व्ह बँक- एकात्मिक लोकपाल योजनेमुळे आज बँकिंग क्षेत्रात 'One Nation, One Ombudsman System' आकाराला आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirmala Sitharaman, PM narendra modi, Rbi, Rbi latest news, Shaktikanta das