मराठी बातम्या /बातम्या /मनी /Work from Home मध्ये शिफ्ट संपल्यानंतर कर्मचाऱ्याला फोन केल्यास भरावा लागणार दंड

Work from Home मध्ये शिफ्ट संपल्यानंतर कर्मचाऱ्याला फोन केल्यास भरावा लागणार दंड

दरम्यान पोर्तुगालमधील घरून काम करण्याच्या नव्या नियमाबाबत जगभर चर्चा आहे. नवीन नियमानुसार, घरून काम करताना कर्मचाऱ्याची शिफ्ट संपल्यानंतर कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कॉल करू शकत नाही.

दरम्यान पोर्तुगालमधील घरून काम करण्याच्या नव्या नियमाबाबत जगभर चर्चा आहे. नवीन नियमानुसार, घरून काम करताना कर्मचाऱ्याची शिफ्ट संपल्यानंतर कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कॉल करू शकत नाही.

दरम्यान पोर्तुगालमधील घरून काम करण्याच्या नव्या नियमाबाबत जगभर चर्चा आहे. नवीन नियमानुसार, घरून काम करताना कर्मचाऱ्याची शिफ्ट संपल्यानंतर कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कॉल करू शकत नाही.

मुंबई, 12 नोव्हेंबर: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. वर्क कल्चरमध्ये (Work Culture During Coronavirus Pandemic) बदल झाले असून अनेकांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. कोरोना काळ (COVID-19) सुरू होऊन दोन वर्ष होत आली तरी अद्याप अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची संकल्पना (Work From Home) सुरूच ठेवली आहे. तर काहींनी स्थायी स्वरुपात घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे.

वर्क फ्रॉम होमबाबत दोन्ही मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. वर्क फ्रॉम होम कल्चरचा परिणाम कंपनी आणि कर्मचारी या दोघांवर दोन प्रकारे होताना दिसत आहे. काही लोक या व्यवस्थेत आनंदी आहेत आणि त्यांनी स्वतःला त्यात जुळवून घेतले आहे, परंतु काही लोक असे आहेत जे घरून काम करताना खूप संतापले आहेत. या लोकांचे म्हणणे आहे की घरून काम केल्याने त्यांच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होत आहे आणि तणावही वाढत आहे. शिवाय कामाच्या वेळा देखील वाढत आहेत, अशी काहींची तक्रार आहे.

हे वाचा-8 रुपयांचा शेअर पोहोचला ₹1090 वर, 1 लाखांचे बनले 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त!

दरम्यान पोर्तुगालमधील घरून काम करण्याच्या नव्या नियमाबाबत जगभर चर्चा आहे. नवीन नियमानुसार, घरून काम करताना कर्मचाऱ्याची शिफ्ट संपल्यानंतर कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कॉल करू शकत नाही. कंपनीकडून तसे करण्यास आल्यास दंड ठोठावला जाईल. "वर्क फ्रॉम होम" ची वेळ संपल्यानंतर, कर्मचार्‍याला फोन करणार्‍या बॉस किंवा वरिष्ठाला शिक्षा देखील होऊ शकते.

पोर्तुगालच्या संसदेने गेल्या आठवड्यात घरून काम करण्यासंदर्भातील नवीन कामगार कायद्याला मंजुरी दिली. हा कायदा कर्मचार्‍यांना कंपनीपासून दूर घरी काम करताना अतिरिक्त संरक्षण प्रदान करतो. पोर्तुगालच्या समाजवादी सरकारने म्हटले आहे की नवीन नियम कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान घरातून काम करणार्‍या बहुतेक कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादावर आधारित आहे.

हे वाचा-PM मोदींनी लाँच केल्या RBI च्या दोन खास योजना, सामान्यांना थेट होणार फायदा

सरकारला असे आढळून आले की घरातून काम करताना कंपनी किंवा कंपनीचे वरिष्ठ कर्मचारी आपल्या कर्मचार्‍यांना सतत कामात व्यस्त ठेवतात. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी फोन करून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अडथळे आणले जातात. घरून काम करणाऱ्यांना ऑफिस कधी सुरू झालं-कधी संपलं कळतच नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोर्तुगीज सरकारने हा कायदा केला आहे.

First published:
top videos

    Tags: Work from home