नवी दिल्ली, 6 जानेवारी : घरात साठवून ठेवलेलं सोनं बँकेत जमा व्हावं यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. CNBC आवाजला मिळालेल्या बातमीनुसार, अर्थ मंत्रालयाने(Finance Ministry) बँकांना दर तिमाहीसाठी टारगेट फिक्स करण्यात आलं आहे. गोल्ड मॉनिटायझेशन क्सीमअंतर्गत (Gold Monetisation Scheme)ग्राहकांचं सोनं बँकेत जमा करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक तिमाहीसाठी ठराविक सोन्याच्या साठ्याचं लक्ष्य बँकांना देण्यात येणार आहे. CNBC ने दिलेल्या बातमीनुसार, अर्थ मंत्रायलाने प्रत्येक बँकेला Gold Monetisation Scheme च्या अंतर्गत हे लक्ष्य दिलं आहे. त्यासाठी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमचं एक खास पोर्टल तयार करण्याचीही केंद्राची योजना आहे. बँकांनी आपापले यासंदर्भातले प्लॅन सादर करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भात सुवर्ण क्षेत्रातले व्यावसायिक, तज्ज्ञ यांची अर्थ मंत्रालयाबरोबर बैठक झाली. यापुढच्या काळाता बँकांकडचा सोन्याचा साठा वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत स्टेट बँकेने(SBI )3.5 टन सोनं जमा केलं आहे. तर आयसीआयसीआय बँकेने(ICICI Bank) 41 किलो सोनं जमा केलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षासाठी बँक ऑफ बरोडाला 200 किलो सोन्याचं लक्ष्य देण्यात आलं आहे. संबंधित - तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर कर भरावा लागतो का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केलेल्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये रिझर्व बँकेने (RBI)बदल केले आहेत. काही नवी नियम यामध्ये आणण्यात आले आहेत. सोनं जमा करू इच्छिणारे थेट बँकेत किंवा कलेक्शन अँड प्युरिटी टेस्टिंग सेंटरमध्ये (CPTC)सोनं जमा करू इच्छितात. बँक त्याबदल्यात ग्राहकांना पैसे किंवा स्कीम देऊ करेल. सोन्याची शुद्धता तपासूनच ग्राहकांना त्याचा मोबदला देण्यात येईल. सोन्यावर व्याज देणाऱ्या स्कीम बँका तुमच्या सोन्याच्या बदल्यात मोबदला किंवा त्यावर व्याज देऊ करेल. SBI ने काही महिन्यांपूर्वी सोन्याची एक योजनाही आणली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) या गोल्ड डिपाॅझिट स्कीम (R-GDS )वर चांगलं व्याज मिळतंच, शिवाय इतर फायदेही आहेत. SBI सोन्याच्या शुद्धतेच्या आधारे तुम्हाला सोन्याचं प्रमाणपत्र देते. तुमचा फिक्स्ड डिपाॅझिटचा काळ संपला की मग 3,4,5 किंवा 6 वर्षांनी त्या सोन्यावर सोन्याच्या रूपात किंवा पैशाच्या रूपात व्याजासहित त्या वेळेच्या दराप्रमाणे पैसे घेऊ शकता.
#AwaazStory| घर के सोने को बैंक तक पहुंचाने की मुहिम तेज, वित्त मंत्रालय ने बैंकों को निर्देश जारी किए। जानिए पूरी खबर @RoyLakshman से @FinMinIndia pic.twitter.com/0vkg8QLyQE
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) January 6, 2020
तुम्ही घरी ठेवलेल्या सोन्याला या स्कीममध्ये लावू शकता. म्हणजे चोरीचं टेन्शन राहणार नाही आणि सोन्यावर व्याजही मिळेल. कोण करू शकतं गुंतवणूक? SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार भारतात राहणारी कुणीही व्यक्ती ही स्कीम घेऊ शकतो. सिंगल आणि जाॅइंट अकाउंटही उघडू शकतात. एचयुएफ, पार्टनरशिप फर्मही यात गुंतवणूक करू शकतात. कमीत कमी किती सोनं गुंतवावं लागतं? या स्कीममध्ये कमीत कमी 30 ग्रॅम सोनं गुंतवावं लागतं. जास्तीत जास्त कितीही गुंतवू शकता. स्कीम मध्येच बंद केली तर दंड एक वर्षाआधी पैसे काढले तर व्याज दरावर दंड पडेल. मीडियम टर्मची गुंतवणूक 3 वर्षांची असते तर लाँग टर्मची गुंतवणूक 5 वर्षांची असते. त्याआधी पैसे काढले तर दंड पडतो. ———————- अन्य बातम्या अमेरिकेचा हवाई हल्ला, थेट तुमच्या खिशावर होणार हे 6 परिणाम Google Pay, Paytm वरून पेमेंट करताना काळजी घ्या, होऊ शकते फसवणूक यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री औरंगाबादच्या MD डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या