मराठी बातम्या /बातम्या /मनी /

यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री

यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री

तुम्ही या नव्या वर्षी पैसे वाचवण्याचा संकल्प केलाय का? किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का? तुम्ही कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता. यासाठी जाणून घ्या या 7 गोष्टी

तुम्ही या नव्या वर्षी पैसे वाचवण्याचा संकल्प केलाय का? किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का? तुम्ही कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता. यासाठी जाणून घ्या या 7 गोष्टी

तुम्ही या नव्या वर्षी पैसे वाचवण्याचा संकल्प केलाय का? किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का? तुम्ही कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता. यासाठी जाणून घ्या या 7 गोष्टी

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 3 जानेवारी : तुम्ही या नव्या वर्षी पैसे वाचवण्याचा संकल्प केलाय का? किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का? यासाठी तुमचा पगार वाढणं किंवा तुम्ही फायद्यातला बिझनेस करणं याचा काहीही संबंध नाही. तुम्ही कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता. यासाठी जाणून घ्या या 7 गोष्टी

1. शेअर बाजार (Stock Market)

शेअर बाजारात सध्या चांगलीच तेजी आहे. शेअर बाजारात योग्य ठिकाणी गुंतवणूक केलीत तर कमी वेळेत आणि कमी पैशात चांगले रिटर्न्स मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी Dmat अकाउंट उघडावं लागेल.

शेअर बाजारात गुंतवणूक करणं कठीण मानलं जातं पण एका व्यक्तीने 5 हजार रुपयांच्या रकमेतून 10 हजार कोटी रुपयांचं मोठं नेटवर्थ बनवलंय. ते म्हणतात, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा व्यापारात गुंतवणूक करा.

2. म्युच्युअल फंड्स (Mutual Funds)

शेअर बाजारात गुंतवणूक करणं जोखमीचं वाटत असेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या इक्विटी आणि अॅसेट क्लासमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळते.

तुम्हाला जर 1वर्ष किंवा 2 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर वेगळा म्युच्युअल फंड असतो. जर 5, 7 आणि 10 वर्षांसाठी किंवा जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काही विशेष म्युच्युअल फंड असतात.

(हेही वाचा : तुम्ही भाड्याच्या घरात राहता का? मग असा बदला आधार कार्डवरचा पत्ता)

3. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यात 7.6 टक्के हिशाबाने व्याज मिळतं. एक व्यक्ती 1500 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जॉइंट अकाउंटमध्ये 9 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.

4. नॅशनल पेन्शन स्कीम

तुम्हाला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असेल तर NPS हा चांगला पर्याय आहे. यामध्ये एफडी, इक्विटी, कॉर्पोरेट बाँड, गव्हर्नमेंट फंड आणि लिक्विड फंडमध्ये पैसे गुंतवता येतात. यामध्ये 80 C ची सवलत मिळते.

5. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)

PPF हे गुंतवणुकीचं चांगलं साधन आहे. हे अकाउंट बँक आणि पोस्टात उघडता येतं. 500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत यामध्ये पैसे जमा करता येतात. ही योजना पुढेही 5-5 वर्षांसाठी वाढवता येते.

(हेही वाचा : नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता)

6 FD - फिक्स्ड डिपॉझिट

FD हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. हे खातंही बँक किंवा पोस्टात उघडता येतं. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणुकीचे पर्याय असतात. यावर 6 ते 8 टक्क्यांचं व्याज असतं.

7. सोन्यामध्ये गुंतवा पैसे (Gold Investment)

तुमच्या गुंतवणुकीत 5 टक्के सोनं हवं. सोन्याच्या किंमतींमध्ये चांगली तेजी राहिली तर सोन्यामधली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

================================================================================

First published:

Tags: Money, Saving