Home /News /money /

तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर कर भरावा लागतो का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं

तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर कर भरावा लागतो का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं

जर लग्नात सोन्याचे दागिने मिळाले तर त्याबद्दल कराचे काय नियम असतात ? घरात ठेवलेल्या सोन्यासाठी काही नियम आहे का ? जाणून घ्या तुमच्या या प्रश्नांची उत्तरं.

  नवी दिल्ली, 4 जानेवारी : नव्या वर्षात सोनं महागल्यामुळे सामान्य माणसांच्या चिंतेत भर पडली आहे. सराफा बाजारात सोन्याची किंमत 40 हजार रुपये तोळ्यांवर पोहोचलीय.सध्या लग्नाचा हंगाम आहे आणि लग्नासाठी सोनं घ्यायचं असेल तर काही नियम लक्षात घेणं गरजेचं आहे. सोनंखरेदी करताना बऱ्याच जणांना कराबद्दलचे नियम माहीत नसतात. त्यामुळे इनकम टॅक्स खात्याची नोटीस येण्याची शक्यता असते. हे नियम पाळले नाहीत तर दंडही द्यावा लागतो. जर लग्नात सोन्याचे दागिने मिळाले तर त्याबद्दल कराचे काय नियम असतात ? तज्ज्ञांच्या मते, लग्नामध्ये वधुला मिळालेल्या दागिन्यांवर कर लागत नाही. सासू- सासरे आणि आई वडील यांच्याकडून मिळालेल्या सोन्यावर कर द्यावा लागत नाही. घरात ठेवलेल्या सोन्यासाठी काही नियम आहे का ? घरात सोन्या-चांदीचे दागिने ठेवण्यासाठी कोणताही मर्यादा नाही पण घरात ठेवलेल्या दागिने कुठून आले हे सांगणं गरजेचं आहे. नोटबंदीच्या नंतर घरात ठेवलेल्या दागिन्यांचं सोर्स सांगणं आवश्यक आहे. विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅम सोनं ठेवण्याची सूट आहे. त्याचबरोबर अविवाहित महिलेला 250 ग्रॅम आणि पुरुषांसाठी 100 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवण्याची सूट आहे.

  (हेही वाचा  : यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री)

  सोन्याची विक्री करताना कर लागेल का? सोन्याची विक्री करायची असेल तर विक्रीवर कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो. सोनं घेतल्यानंतर पहिल्या 3 वर्षांत त्याची विक्री केली तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो. जर 3 वर्षांनी सोनं विकलंत तर लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागेल. इनकम टॅक्स भरताना सोन्याच्या दागिन्यांची माहिती द्यावी लागते का ? तुमचा टॅक्सेबर इनकम 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर सोन्याच्या दागिन्यांचा तपशील ITR मध्ये द्यावा लागेल. इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमचे दागिने जप्त करू शकता? हो. इनकम टॅक्स विभाग तुमचे दागिने जप्त करू शकतो. IT विभागाने दागिने जप्त केले तर 138 टक्क्यांचा कर लागेल. ================================================================================
  Published by:Arti Kulkarni
  First published:

  Tags: Gold, Money

  पुढील बातम्या