जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबादच्या MD डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

औरंगाबादच्या MD डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

औरंगाबादच्या MD डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

या प्रकरणी घाटी हॉस्पिटल आणि गौडा यांच्या मित्रांकडेही चौकशी करण्यात येणार असून काही धागेदोरे मिळतात का याची चौकशी पोलीस करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद 06 जानेवारी : औरंगाबाद इथल्या प्रसिद्ध घाटी रुग्णालयाला हादरविणारी घटना आज घडलीय. या हॉस्पिटमधले प्रतिथयश डॉक्टर शेषाद्री गौडा यांनीं आज आत्महत्या केलीय. गौडा यांनी याच हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतलं होतं. MD Medicine असलेले डॉक्टर गौडा हे गोल्ड मेडलिस्ट होते. अतिशय हुशार आणि मनमिळावू अशी त्यांची ख्याती होती. असा लौकीक असतानाही त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. गौडा यांनी औरंगाबाद मधल्या राहत्या घरी इंजेक्शन घेतली आणि आपलं आयुष्य संपवलं. डॉक्टरने नेमकी का आत्महत्या केली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून सर्व शक्यतांचा विचार करून चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी घाटी हॉस्पिटल आणि गौडा यांच्या मित्रांकडेही चौकशी करण्यात येणार असून काही धागेदोरे मिळतात का याची चौकशी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात