अमेरिकेचा हवाई हल्ला, थेट तुमच्या खिशावर होणार हे 6 परिणाम

अमेरिकेचा हवाई हल्ला, थेट तुमच्या खिशावर होणार हे 6 परिणाम

अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणमधला जनरल कासिम सुलेमानी मारला गेला. अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. या हल्ल्यामुळे 6 गोष्टी बदलणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जानेवारी : अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणमधला जनरल कासिम सुलेमानी मारला गेला. अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. या हल्ल्यामुळे 6 गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे आधीच असलेल्या महागाईध्ये आणखी वाढ होण्याचा धोका आहे.

1. पेट्रोल - डिझेलचा भडका

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. भारत अरब देशांसह इराणमधूनही क्रूड ऑइलची आयात करत होता. मात्र, अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधानंतर भारताने इराणकडून तेल घेणं बदं केलं.

2. जीवनावश्यक वस्तू महागणार

पेट्रोल - डिझेल महाग झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. भाज्या, फळं, दूध अशा वस्तूंच्या किंमती वाढू शकतात, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

(हेही वाचा : यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री)

3. सोनं-चांदी महागलं

सोन्यामध्ये तेजीचं प्रमाण आजही कायम होतं. आठवडा संपताना सोन्याचे दर 752 रुपये प्रतितोळा झालेत. त्याचवेळी चांदीच्या भावात 960 रुपयांची वाढ झालीय.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू ओढवल्याने आखाती देशात तणाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलाय. त्यामुळे सोनं महाग झालंय.

(हेही वाचा : खूशखबर! हेल्थ इन्शुरन्सबद्दलचे नियम बदणार, सामान्यांना होणार फायदा)

4. शेअर बाजार गडगडला

संभाव्य युद्धाच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअरची विक्री करत पैसे काढून घेणे पसंत केलं. यामुळे आशियातल्या प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स १६२ अंकांनी घसरला आणि ४१४६५ अंकावर बंद झाला. निफ्टी ५६ अंकांनी घसरला आणि १२२२७ अंकावर बंद झाला.

5. महागाई वाढणार

कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतींचा जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर परिणाम होणार आहे. यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. आर्थिक मंदीच्या काळात ही चिंताजनक बातमी आलीय.

6. लग्नाच्या हंगामात महागाईची झळ

सध्या लग्नाचा हंगाम आहे. त्यामुळे सोनं- चांदीच्या वाढलेल्या किंमती आणि त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव पाहता लग्नसराई चांगलीच महागणार आहे.

====================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: January 3, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading