Home /News /money /

Budget 2022: अर्थसंकल्पात येणाऱ्या या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितेय का? सोप्या भाषेत घ्या समजून

Budget 2022: अर्थसंकल्पात येणाऱ्या या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितेय का? सोप्या भाषेत घ्या समजून

अर्थसंकल्पीय भाषणात (Budget 2022) असे काही तांत्रिक आणि आर्थिक शब्द वापरले जातात, ज्याचा अर्थ अनेकदा सामान्यांना माहित नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असंही होतं की महत्त्वाचा मुद्दा नागरिकांच्या लक्षातच येत नाही. जाणून घ्या या शब्दांचे अर्थ

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 16 जानेवारी: अर्थसंकल्पीय भाषणात (Budget 2022) असे काही तांत्रिक आणि आर्थिक शब्द वापरले जातात, ज्याचा अर्थ अनेकदा सामान्यांना माहित नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असंही होतं की महत्त्वाचा मुद्दा नागरिकांच्या लक्षातच येत नाही. या टेक्निकल आणि फायनान्शिअल टर्म्सना जार्गन (Jargon) म्हटले जाते. आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पीय अंदाज, सुधारित अंदाज, अतिरिक्त अनुदान, आउटकम बजेट, सेंट्रल प्लॅन आउटले इ. महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला अर्थसंकल्पीय भाषण समजण्यास मदत होईल. आर्थिक वर्ष (Financial Year) आर्थिक वर्ष हे आर्थिक बाबींचा लेखाजोखा ठेवण्यासाठी आधार मानले जाते. याला सरकारद्वारे अर्थसंकल्पीय हेतूंसाठी वापरला जाणारा कालावधी देखील म्हटले जाते. हे व्यापार आणि इतर संस्थांद्वारे आर्थिक अहवालासाठी देखील वापरले जाते. अर्थसंकल्पीय अंदाज (Budget Estimates) अर्थसंकल्पीय अंदाज म्हणजे सरकार एका आर्थिक वर्षात किती खर्च करेल आणि देश चालवण्यासाठी करांच्या माध्यमातून किती महसूल मिळेल याचा अंदाज आहे. अशा अंदाजामध्ये एका वर्षासाठी वित्तीय आणि महसुली तूट देखील समाविष्ट असते. यासोबतच विविध क्षेत्रे, पायाभूत सुविधा आणि राष्ट्र उभारणीसाठीच्या खर्चाचाही त्यात समावेश आहे. थोडक्यात म्हटलं तर देश चालवण्यासाठी सरकारला किती उत्पन्न मिळेल आणि त्यातील किती खर्च होईल याचा अंदाज म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाज. हे वाचा-LIC Jeevan Pragati Scheme : दरमाह 6000 वाचवा आणि 28 लाख मिळवा सुधारित अंदाज (Revised estimates) कोणत्याही आर्थिक वर्षादरम्यान किंवा वर्षअखेर शिल्लक राहिलेल्या कालावधीत सरकारला किती महसूल मिळेल आणि त्यातील किती खर्च होईल, त्याच्या अंदाजे रकमेला सुधारित अंदाज म्हणतात. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या आधारे हा अंदाज निश्चित केला जातो. अर्थसंकल्पीय अंदाजात जे लक्ष्य निश्चित केले जाते त्यामध्ये आणि सुधारित अंदाजात फरक जाणवतो. अतिरिक्त अनुदान (Excess Grants) जेव्हा मंत्रालय, विभाग, योजना किंवा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात पारित केलेली रक्कम कमी पडते, तेव्हा अतिरिक्त रक्कम वाटप करण्याचा ठराव संसदेत पाठवला जातो. याला अतिरिक्त अनुदान म्हणतात. ही रक्कम संसदेने मंजूर केल्यावर त्या विभागाला, योजनेला किंवा प्रकल्पाला अतिरिक्त निधी मिळतो. आउटकम बजेट (Outcome of budget) प्रत्येक मंत्रालयाला बजेटआधी अर्थ मंत्रालयाला एक आउटकम बजेट द्यावे लागते. हे मंत्रालय आणि विभागांचे प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड असते, ज्यामध्ये त्यांनी आधीच्या वर्षात केलेल्या बजेटमधील घोषणांमध्ये किती प्रगती केली आहे याचा लेखाजोखा असतो. यामध्ये हे पाहिले जाते की कोणत्या योजनेचे किती काम झाले आहे आणि त्यासाठी दिलेल्या रकमेचा किती वापर झाला आहे. हे वाचा-आज एक लीटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार, वाचा लेटेस्ट दर इथे सेंट्रल प्लॅन आउटले (Central Plan Outlay) केंद्र सरकारद्वारे कोणतेही मंत्रालय, सेक्टर किंवा विभागाला किती रक्कम वाटप करण्यात आली आहे, याला सेंट्रल प्लॅन आउटले म्हणतात. अर्थात आउटले अशी रक्कम आहे जी कोणत्याही थीम किंवा प्रोजेक्टसाठी अर्थव्यवस्थेचे विविध सेक्टर्स, मंत्रालयं आणि विभागांना अलॉट केली जाते. पुनर्विनियोग  (Re-appropriations) विनियोग म्हणजे विशिष्ट उद्देशासाठी निधी बाजूला ठेवणे. म्हणजेच विविध मंत्रालये आणि सरकारी विभागांना अनुदान म्हणून देण्यासाठी जो निधी राखून ठेवला जातो त्याला विनियोग असे म्हणतात. दरम्यान जेव्हा एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे निधी हस्तांतरित केला जातो तेव्हा त्याला पुनर्विनियोग म्हणतात. सबव्हेंशन (Subvention) सरकारकडून एखाद्या संस्थेला किंवा क्षेत्राला दिले जाणारे अनुदान किंवा मदत म्हणजे सबव्हेंशन. याअंतर्गत सरकार एखाद्या क्षेत्रासाठी एखाद्या वित्तीय संस्थेला बाजार दरापेक्षा कमी दराने  कर्ज देण्यास सांगू शकते. उदा. शेतकऱ्यांना बाजार दरापेक्षा कमी व्याजदराने कर्ज देण्यास सांगणे याला राजकीय सहाय्य किंवा सबव्हेंशन म्हणतात. हे वाचा-SBI ग्राहकांसाठी Good News! आता Fixed Deposit वर मिळणार अधिक व्याज CENVAT हा केंद्रीय मूल्यवर्धित कर आहे, जो उत्पादकावर आकारला जातो. हा कर 2000-2001 मध्ये सादर करण्यात आला होता. आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) आर्थिक सर्वेक्षणाची कागदपत्रे संसदेत सादर झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थ मंत्रालयाने अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर आपला दृष्टिकोन मांडून ते तयार केले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Budget, Union budget

    पुढील बातम्या