#union budget

Showing of 1 - 14 from 164 results
VIDEO VIRAL : जयंत सिन्हा यांच्या मागे उभी राहून वाकुल्या दाखवणारी 'ती' मुलगी कोण?

व्हिडिओFeb 2, 2019

VIDEO VIRAL : जयंत सिन्हा यांच्या मागे उभी राहून वाकुल्या दाखवणारी 'ती' मुलगी कोण?

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू होती, पण यावेळी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा होते. पण ही चर्चा वेगळ्याच कारणासाठी होती. मोदी सरकारचं अभिनंदन करत ते बोलत असतांना त्यांच्या मागे एक मुलगी होती. या मुलीने कॅमेऱ्याकडे पाहून वाकुल्या काढून दाखवण्यास सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे जयंत सिन्हा किंवा आजुबाजूला असणाऱ्या कोणालाही याची कल्पनाही आली नाही. या मुलीने फक्त एकदा नाही तर तीन ते चार वेळा कृतीची पुनरावृत्ती केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय, आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालाय. दरम्यान, अशाप्रकारे संसदेत एका नेत्याच्या मागे उभे राहून इतक्या बिनधास्तपणे वाकुल्या काढून दाखवणारी मुलगी कोण आहे असा सवाल विचारला जातोय.

Live TV

News18 Lokmat
close