जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहकांसाठी Good News! आता Fixed Deposit वर मिळणार अधिक व्याज

SBI ग्राहकांसाठी Good News! आता Fixed Deposit वर मिळणार अधिक व्याज

SBI ग्राहकांसाठी Good News! आता Fixed Deposit वर मिळणार अधिक व्याज

एसबीआयने (SBI FB Interest Rate) शनिवारी फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडी (Fixed Deposit)च्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जानेवारी: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State bank of India Latest Update) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने (SBI FB Interest Rate) शनिवारी फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडी (Fixed Deposit)च्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक असणाऱ्या एचडीएफसी (HDFC FD Interest Rate) बँकेने देखील एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्या कालावधीसाठी वाढले एफडी रेट्स एसबीआयने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ते दोन वर्षापर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केले आहे. या कालावधीसाठी केल्या जाणाऱ्या एफडीवर आता 10 बेसिस पॉइंट्सनी अर्थात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.  एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ते दोन वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता 5 टक्क्यांऐवजी 5.1 टक्क्याने व्याज मिळेल. हे वाचा- LIC Jeevan Pragati Scheme : दरमाह 6000 वाचवा आणि 28 लाख मिळवा कधीपासून नवे दर लागू होणार हे नवीन दर 15 जानेवारी 2022 (शनिवार) पासून लागू झाले आहेत. व्याजाचे हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी आहेत. याशिवाय या वाढीनंतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या एफडीवरील व्याजदरातही वाढ झाली आहे. आता एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ते दोन वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना आता 5.5 टक्क्यांऐवजी 5.6 टक्क्याने व्याज मिळेल. अन्य कोणत्याही कालावधीसाठी एफडी दरात बँकेने बदल केलेला नाही. नॉन-सीनिअर सिटीझन्ससाठी एसबीआयचे एफडीवरील व्याजदर

कालावधीसध्याचे व्याजदरनवीन व्याजदर
7 दिवस ते 45 दिवसापर्यंत2.9%2.9%
46 दिवस ते 179 दिवसापर्यंच3.9%3.9%
180 दिवस ते 210 दिवसापर्यंत4.4%4.4%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी4.4%4.4%
1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक पण 2 वर्षापेक्षा कमी5%5.1%
2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक पण 3 वर्षापेक्षा कमी5.1%5.1%
3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक पण 5 वर्षापेक्षा कमी5.3%5.3%
5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक पण 10 वर्षापेक्षा कमी5.4%5.4%
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात