Home /News /money /

LIC Jeevan Pragati Scheme : दरमाह 6000 वाचवा आणि 28 लाख मिळवा, योजनेबद्दल डिटेल्स चेक करा

LIC Jeevan Pragati Scheme : दरमाह 6000 वाचवा आणि 28 लाख मिळवा, योजनेबद्दल डिटेल्स चेक करा

LIC च्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 12 वर्षे आहे. त्याच वेळी, या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दर महिन्याला 6 हजार रुपये म्हणजेच दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जानेवारी : एखाद्या योजनेत गुंतवणुकीचा विचार करत असाल, मात्र गुंतवणुकीच्‍या योजनेबद्दल संभ्रमात असल्‍यास आणि सुरक्षित गुंतवणूक प्‍लॅनच्‍या शोधात असल्‍यास, LIC तुमच्‍यासाठी खास योजना घेऊन आली आहे. LIC च्या जीवन प्रगती योजनेत (LIC Jeevan Pragati Scheme) दररोज 200 रुपयांची बचत करून तुम्हाला 28 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. LIC ची जीवन प्रगती योजना ही एक एंडोमेंट योजना आहे, जी तुम्हाला सुरक्षितता आणि बचत देखील देते. पॉलिसीमधील रिस्क कव्हर दर पाच वर्षांनी वाढते. LIC च्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 12 वर्षे आहे. त्याच वेळी, या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दर महिन्याला 6 हजार रुपये म्हणजेच दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील. गुंतवणूकदार या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. फक्त 330 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण! कोरोनाने मृत्यूनंतरही नॉमिनीला मिळणार पैसे पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, मृत्यूवर विम्याची रक्कम + सिम्पल रिव्हर्सनरी बोनस (जमा झालेला बोनस) + अंतिम अतिरिक्त बोनस (जमा असल्यास) नॉमिनीला दिला जाईल. गुंतवणुकीवर कर बचतीसह दमदार रिटर्न्स हवेत? मग हा आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय गुंतवणुकीवर लाईफ कव्हर मिळेल LIC च्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला बचतीसोबत संरक्षण देखील मिळते. एलआयसीच्या या योजनेत, तुम्हाला नियमित प्रीमियम भरल्यावर डेथ बेनिफिट (Death Benifit) देखील मिळतो. त्याची रक्कम दर पाच वर्षांनी वाढते. तुम्ही पॉलिसी किती वर्षे घेतली आहे यावरही ते अवलंबून असते. >> पहिल्या 0 ते 5 वर्षांसाठी, तुम्हाला 100% बेसिक मिळते. >> 6 ते 10 च्या कार्यकाळाच्या दरम्यान, तुम्हाला 125% पर्यंत बेसिक मिळते. >> 11 ते 15 वर्षांच्या कालावधीसाठी 150 टक्के मूलभूत उपलब्ध आहे. >> त्याच वेळी, 16 ते 20 या कालावधीसाठी 200 टक्के मूलभूत उपलब्ध आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC, Money

    पुढील बातम्या