Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: आज एक लीटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार, वाचा लेटेस्ट दर इथे

Petrol-Diesel Price Today: आज एक लीटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार, वाचा लेटेस्ट दर इथे

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या अनेक दिवसांपासून बदल झालेला नाही. मात्र जरी इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे.

    मुंबई, 16 जानेवारी: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price Today) गेल्या अनेक दिवसांपासून बदल झालेला नाही. नवीन वर्षाचा पहिल्या पंधरवड्यानंतरही आज पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 16th January 2022) स्थिर आहेत. मात्र जरी इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत. महाराष्ट्रात काय आहेत दर मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही (Petrol diesel price in Maharashtra) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरआहेत. हे वाचा- कमाईची नवी संधी! जानेवारी अखेरीस येऊ शकतो Adani Wilmar IPO, वाचा सविस्तर पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 109.45 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.25 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये
    असे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा-दरमहा 10000 भरा अन् मिळवा 16 लाख रुपये, पोस्टाच्या योजनेबद्दल जाणून घ्या सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and Diesel price cut

    पुढील बातम्या