जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आठवलेंची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आठवलेंची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

रामदास आठवले यांचं अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य

रामदास आठवले यांचं अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य

राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावर आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • -MIN READ Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 28 एप्रिल : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून विखे पाटलांचं नाव आघाडीवर आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना देखील मुख्यमंत्रीपद मिळू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत चढाओढ सुरू आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हास्यास्पद आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. पण जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना ऑफर  पुढे बोलताना आठवले यांनी म्हटलं आहे की, अजितदादांना तिकडे मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल असं वाटत नाही. आम्हाला अजित पवारांची गरज नाही. शरद पवार यांनी एनडीएसोबत यायला पाहिजे. मी आलो आहे तर पवार यांना यायला काय हरकत आहे. शरद पवार यांनी आता ठोस निर्णय घ्यावा, ज्यांना जायचे त्यांना असं म्हणण्यापेक्षा शरद पवारांनीच आता एनडीएमध्ये यावं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आठवलेंचीही उडी, शरद पवारांना दिली मोठी ऑफर मुख्यमंत्रिपदाची इच्छा  दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे. आपणही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक आहोत. जर भविष्यात दलित मुख्यमंत्र्यांचा विचार झाल्यास आपल्या संधी द्यावी असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात