सांगली, 28 एप्रिल : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून विखे पाटलांचं नाव आघाडीवर आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना देखील मुख्यमंत्रीपद मिळू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा सुरू आहे. मला सुद्धा मुख्यमंत्री व्हावे वाटते. भविष्यात दलित मुख्यमंत्र्याबाबत विचार झाला तर आपल्या नावाचा विचार व्हावा असं आठवले यांनी म्हटलं आहे. आठवले नेमकं काय म्हणाले? मुख्यमंत्रीपदाबाबत चढाओढ सुरू आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हास्यास्पद आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. पण जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही. मला सुद्धा मुख्यमंत्री व्हावे वाटते. भविष्यात दलित मुख्यमंत्र्याबाबत विचार झाला तर आपल्या नावाचा विचार व्हावा असं आठवले यांनी म्हटलं आहे. शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर युतीबाबत बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले आम्ही.. शरद पवारांना ऑफर दरम्यान यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील ऑफर दिली आहे. अजितदादांना तिकडे मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल असं वाटत नाही. आम्हाला अजित पवारांची गरज नाही. शरद पवार यांनी एनडीएसोबत यायला पाहिजे. मी आलो आहे तर पवार यांना यायला काय हरकत आहे. शरद पवार यांनी आता ठोस निर्णय घ्यावा, ज्यांना जायचे त्यांना असं म्हणण्यापेक्षा शरद पवारांनीच आता एनडीएमध्ये यावं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







