धाराशिव, 26 फेब्रुवारी : अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे, कामाला लागा असे आदेश काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर अजित पवार हेच राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता निलेश लंके यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी हे एक कुटुंब असून, या कुटुंबात कोणाला कोणती जबाबदारी द्यायची याचे सर्व अधिकार हे कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांना असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे.
नेमंक काय म्हटलं लंके यांनी?
अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे, कामाला लागा असे आदेश काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र आता आपल्या वक्तव्यावरून लंके यांनी घुमजाव केला आहे. राष्ट्रावादी हे कुटुंब असून यात कोणती जबाबदारी कोणाला द्यायची याचे सर्व अधिकार कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार यांना असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे. आमदार लंके हे धाराशिव जिल्ह्यातील संजीपूर येथे जल जिवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या भुमीपुजन कार्यक्रमासाठी आले होते यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरेंना पत्र लिहीत मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुख्यमंत्रीपदावरून पोस्टरबाजी
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर काही पोस्टर लावण्यात आले होते. ज्या पोस्टरमध्ये सुप्रिया सुळे यांचा भावी पहिल्या महिला मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. तर असेच पोस्टर अजित पवार यांचे देखील लावण्यात आले होते. ज्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar, Supriya sule