जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंना पत्र लिहीत मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज ठाकरेंना पत्र लिहीत मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज ठाकरे

राज ठाकरे

मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. आता आज आणखी एक धक्का बसला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 फेब्रुवारी :  मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर हे कार्यकर्ते थेट महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर आता मनसेच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. मनसेत मसल मॅन म्हणून परिचित असलेले मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनीष धुरी यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरेंचे कट्टर समर्थक  मनीष धुरी हे मनसेचे अंधेरी येथील विभाग अध्यक्ष आहेत. मनीष धुरी राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक मानले जातात. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा सहभाग आहे. मात्र अचनाक मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. धुरी यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. Chinchwad by-election : वडिलांच्या आठवणीने जगतापांची लेक झाली भावुक, डोळ्यात आलं पाणी  राज ठाकरेंना पत्र   दरम्यान राजीनाम्यानंतर मनीष धुरी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना एक पत्र देखील लिहीलं आहे. पक्षानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनीष धुरी यांनी या पत्रात राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे  राजीनामे देत आहे. पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करेल, अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचं मनीष धुरी यांनी  या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान मनीष धुरी यांच्या राजीनाम्यामागे पश्चिम उपनगरात पक्षांतर्गत असलेली गटबाजी जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात