हेही वाचा...रोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण, चंद्रकांत पाटलांना लगावला टोला अजितदादांनी दिले असे संकेत राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तारूढ झालं आहे. या सरकारने बघता बघता तीन महिने पूर्ण केले आहेत. काही निर्णय सोडले तर या सरकारचं बरं सुरु आहे. शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्परांचं कौतुक केलं होतं. रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मैत्रीमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोस्ती आणि समन्वयाबद्दल आणखी एक विधान केलं आहे. ते ऐकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. तर अजित पवार यांचं हे विधान ऐकून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर प्रश्न आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. हेही वाचा...विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले, मुख्य सचिवांना गेटवर माफी मागण्याची सुनावली शिक्षा काय म्हणाले अजित पवार? रविवारी मुंबईतल्या सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पण यावेळी बोलता बोलता अजितदादांनी,'शिवसेना मुंबईत महापालिकत नंबर एक आहे. तर आपण फारच कमी आहोत. शिवसेनेला नंबर एक राहू दे आपण त्यांच्या बरोबरीने आपला नंबर वाढवू' असं म्हटलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला टाळा वाजवून प्रतिसाद दिला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक 8 वरुन 60 झाले पाहिजेत, असंही अजितदादा म्हणाले. शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे. ती राहिलीच पाहिजे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर राहिली पाहिजे, असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. अजितदादांच्या याच वक्तव्यावर आशिष शेलार यांनी खोचक ट्वीट करून राष्ट्रवादीवर टीका केली होती. हेही वाचा...विधान परिषदेत धनगर आरक्षणाबाबत ठाकरे सरकारची मोठी घोषणापक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय... https://t.co/DtEgVUYXCd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Ashish shelar, BJP, Dhananjay munde, Mumbai municipal corporation election, NCP