रोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण, चंद्रकांत पाटलांना लगावला टोला

रोहित पवारांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण, चंद्रकांत पाटलांना लगावला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 मार्च: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. इतकंच नाही तर रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला देखील लगावला आहे. अनुभवापेक्षा यांचं काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता, असं मला वाटतं, असं रोहित पवार यांनी आपल्या 'ट्वीट'मध्ये म्हटलं आहे.

तुमच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळं तर तुम्ही 'अनुभवावर' बोलत नाहीत ना? अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता रोहित पवार यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, काहीही अनुभव नसताना थेट सीएम झाले, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर रोहित पवार यांनी ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.

हेही वाचा...शिवसेना-राष्ट्रावादी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढू शकते, अजितदादांचे संकेत

'बुरे दिन' हे अहंकाराचं फळ...आत्ता_तरी_सुधरा_राव

दुसरीकडे, रोहित पवार यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तुमच्या पक्षासाठी आलेले 'अच्छे दिन' हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले 'बुरे दिन' हे अशाच अहंकाराचं फळ आहे. आत्ता तरी सुधरा राव, असा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपची खिल्ली उडवणारे ट्वीट केलं आहे.

हेही वाचा...विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी राज ठाकरेंना का झाला आनंद? मुलाखतीतून केला खुलासा

रोहित पवार यांच्या ट्वीटवर रिट्वीट करत आशिष शेलार यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. 'राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू...आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!', अशा शब्दात आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे.

First Published: Mar 1, 2020 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading