विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले, मुख्य सचिवांना गेटवर माफी मागण्याची सुनावली शिक्षा

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले, मुख्य सचिवांना गेटवर माफी मागण्याची सुनावली शिक्षा

अधिवेशनाच्या सुरुवातीला अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना कडक शब्दात तंबी दिली

  • Share this:

मुंबई, 2 मार्च : आज विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातील धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेला होता. तत्पूर्वी विधानसभा अधिवेशनाच्या सुरुवातीलाच अध्यक्ष नाना पटोले यांचा पारा चढला होता. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना कडक शब्दात तंबी दिली. मुख्य सचिवांनी विविध विषयांसंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तरं न पाठविल्याने यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले. यावेळी त्यांनी मेहतांना शिक्षा सुनावली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी विधानसभेच्या गेटवर माफी मागावी अशी शिक्षा पटोलेंनी यावेळी सुनावली. गेटजवळ त्यांनी माफी मागावी व विचारलेल्या मुद्द्यावर खुलासा करावा असं ते विधीमंडळात म्हणाले. मुख्य सचिवांना थेट अशी शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. नियमानुसार  मुद्द्यांना एका महिन्यात उत्तर द्यावयाचे असते मात्र दिरंगाईबद्दल वारंवार पाठवुरावा केला जात होता. मात्र तरीही उत्तर मिळत नसल्याने अध्यक्ष भडकले.

गेल्या अधिवेशनात ८३ औचित्याचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यापैकी केवळ 4 मुद्द्यांना प्रशासनाने उत्तर दिले. त्यानंतर या विषयांचा पाठपुरावा केला जात होता. यासंदर्भात विविध प्रश्न तत्सम विभागाला विचारण्यात येत होते. मात्र याचं उत्तर न आल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना कडक शब्दात तंबी दिली. यानंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर शिक्षेचा निर्णय मागे घेण्यात आला. आज विधीमंडळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. यावेळी या समाजासाठी जे काही करण्याची गरज आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

हे वाचा - CM उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर पिस्तुलासह तरुणाला अटक

First published: March 2, 2020, 1:29 PM IST

ताज्या बातम्या