मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'राष्ट्रवादीचे 10-12 आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात', पण निर्णय कधी?

'राष्ट्रवादीचे 10-12 आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात', पण निर्णय कधी?

विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असून पवार कुटुंबाला फोडण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट कालच रोहित पवार यांनी केला.

विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असून पवार कुटुंबाला फोडण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट कालच रोहित पवार यांनी केला.

विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असून पवार कुटुंबाला फोडण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट कालच रोहित पवार यांनी केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 ऑक्टोबर : विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असून पवार कुटुंबाला फोडण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट कालच रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांच्या गौप्यस्फोटानंतर आता याचाच नवा अंक सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10-12 आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. संपर्कात असलेल्या या आमदारांचा योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केला आहे.

याआधी 14 ऑक्टोबरला रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि उदय सामंत यांची भेट झाली होती. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय विश्रामगृहात सामंत आणि तटकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याआधी मंत्री असलेल्या शंभुराज देसाई यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचं विधान केलं होतं.

ठाकरेंनंतर शिंदेंचं पुढचं टार्गेट पवार, 'राष्ट्रवादी'चा पेपर आधीच फोडला!

अजितदादांची सारवासारव

पवार कुटुंब फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा दावा रोहित पवारांनी केल्यानंतर लगेचच अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असं बोलूच शकत नाही. तसं काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावं लागेल, त्याने नेमकं कशामुळे हे वक्तव्य केलं ते पाहावं लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो, अशी सारवासारव अजित पवारांनी केली.

पुढचं टार्गेट पवार कुटुंब? रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचा गुगली

रोहित पवारांचं स्पष्टीकरण

हा सगळा वाद वाढल्यानंतर अखेर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'फोडाफोडीचं राजकारण होत आहे. शिवसेना हा मोठा पक्ष फोडण्यात आला. एक मोठा पक्ष फोडल्यानंतर फोडाफोडीचंच राजकारण करायचं असेल, तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे. एक मोठा पक्ष फोडल्यानंतर पुढचं टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकतं, असं मी बोलता बोलता म्हणालो. मी भाजप म्हणालो नव्हतो, तर विरोधात असलेल्या पक्षाचं, असं मी म्हणालो होतो,' असं रोहित पवारांनी सांगितलं.

पवार कुटुंबात फुटीसाठी डाव, पण विरोधक 'भाजप' नाही मग कोण? रोहित पवारांचा इशारा नेमका कुठे?

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar