मुंबई, 18 ऑक्टोबर : शिवसेनेला फोडल्यानंतर विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांच्या या गौप्यस्फोटावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असं बोलूच शकत नाही. तसं काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावं लागेल, त्याने नेमकं कशामुळे हे वक्तव्य केलं ते पाहावं लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो, अशी सारवासारव अजित पवारांनी केली आहे.
रोहित पवारांच्या या आरोपांवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना रोहित पवारांनी केलेल्या या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणामध्येही फूट पाडण्याचा आमचा प्रयत्न नाही. त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, हा त्यांचा अंतर्गत कलह असेल. भविष्यात काही घडणार असेल आणि त्याची चाहूल लागल्याने ते आता आमच्यावर खापर फोडत असतील, असा गुगली गिरीश महाजन यांनी टाकला आहे.
'पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव', रोहित पवारांच्या आरोपांवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया#NCP #RohitPawar #BJP pic.twitter.com/Vn8VOy4Wni
— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2022
काय म्हणाले रोहित पवार?
शिवसेनेनंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण काहीही झालं तरी आमच्यात फूट पडणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नाही, असं विधान रोहित पवार यांनी केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, Girish mahajan, NCP, Sharad Pawar