जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाकरेंनंतर शिंदेंचं पुढचं टार्गेट पवार, 'राष्ट्रवादी'चा पेपर आधीच फोडला!

ठाकरेंनंतर शिंदेंचं पुढचं टार्गेट पवार, 'राष्ट्रवादी'चा पेपर आधीच फोडला!

ठाकरेंनंतर शिंदेंचं पुढचं टार्गेट पवार, 'राष्ट्रवादी'चा पेपर आधीच फोडला!

उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर एकनाथ शिंदेंचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा सूचक इशारा शिंदे गटातल्या मंत्र्याने दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी मुंबई, 16 ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत हे सरकार चालेल, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कळेल, ज्या आमदारांना सोबत घेतलं त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या टीकेवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शंभुराज देसाई यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आता एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काय म्हणाले शंभुराज देसाई? ‘दादांना आता हे बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांचे आमदार आम्हाला भेटतात, काय बोलतात, त्यांनासुद्धा आता आमदारांना थोपवायचं आहे. आमचं 170 चं बहुमत आहे, आमचं 169 होणार नाही. 175-180-185 होईल. आपले आमदार थोपवावेत म्हणून भाषणात सरकार पडणारे म्हणून बोलायचं. पाण्याविना मासा तसं सत्तेविना अजित पवार, असं समीकरण महाराष्ट्रात झालं आहे,’ असं शंभुराज देसाई म्हणाले.

जाहिरात

शंभुराज देसाईंच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेंचं पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे का? अशा चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 अशा 50 आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. सामना’चं काम फक्त टीका सामना पेपरमध्ये फक्त आमच्यावर किंवा भाजपवर टीका करणं हेच काम उरलं आहे. पूर्वी बाळासाहेबांचे ज्वलंत विचार ऐकायला मिळायचे, आता फक्त टीका होते, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात