जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / winter session : सीमाभागात योजना कुणी बंद केल्या होत्या? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

winter session : सीमाभागात योजना कुणी बंद केल्या होत्या? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राजकारण करण्यासाठी आपल्याकडे खूप मुद्दे आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते

राजकारण करण्यासाठी आपल्याकडे खूप मुद्दे आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते

राजकारण करण्यासाठी आपल्याकडे खूप मुद्दे आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 19 डिसेंबर : सीमावासियांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. बाळासाहेबांची सुद्धा इच्छा होती, सीमाभागाचा मुद्दा सुटला पाहिजे. पण अडीच वर्षांमध्ये सीमावासियांच्या योजना बंद केल्या होत्या. तुम्ही काय सीमावासियांबद्दल बोलत आहात, सीमाभागाच्या मुद्यावर राजकारण करू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाभागाच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं.

‘अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा सन्मानाचा आहे आणि योग्य आहे. अमित शहा यांच्यासमोर चर्चा झाली. हे पहिल्यांदाच घडले आहे. ही बाजू त्यांनी गांभीर्यांनी घेतली. आम्ही ठोसपणे सांगितले, आमच्या गाड्या अडवल्या जातात, गाड्या फोडल्या जाऊ शकतात, हे आम्ही सांगितलं. शहा यांनी योग्य ती समज दिली. अशी घटना होणार नाही, कोर्टामध्ये प्रकरण आहे, सर्वांनी धीर धरला पाहिजे, असंही शहांनी सांगितलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं. (अजितदादांनी मांडला कर्नाटक वादाचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांनी मध्येच अडवलं) अमित शहांनी मीडियामध्ये सुद्धा सांगितलं, त्याचं विरोधकांनी स्वागत केलं पाहिजे. याआधीचे जे सरकार होते, त्यावेळी किती मोर्चे निघाले, त्याला कुणी परवानगी दिली, त्याचीही माहिती घेतली पाहिजे. राजकारण करण्यासाठी आपल्याकडे खूप मुद्दे आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते. त्या ठिकाणच्या योजना होता. त्या बंद केल्या होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व सुरू केल्या आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ( मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? संजय राऊतांचा विरोधकांना रोखठोक सवाल ) अमित शहा यांच्यासमोर बोम्मई यांना आम्ही ट्वीटबद्दल विचारलं तर त्यांनी ते ट्वीट आमचं नाही म्हणून सांगितलं आहे. ते कुणी केलं आहे, याची माहिती सुद्धा मिळाली आहे. कुठला पक्ष आहे, याची माहिती मिळणार आहे, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात