मुबई, 19 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला. हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहे. पण संजय राऊत यांचा हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा नसून मराठा मोर्चाचा आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच संजय राऊत अधूनमधून असं करत असतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. यानंतर आता संजय राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत -
मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? असा सवाल करत मी कधीच म्हटलं नाही की, तो मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. हे लोक त्याला नॅनो मोर्चा म्हणता आहेत. मी दोन्ही मोर्चांचे व्हिडिओ टाकले. दोन्ही मोर्चे राज्याच्या स्वाभिमानासाठी होते. त्यासाठी भाजपला इतकी टिका करण्याचं कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, माझं ट्विट नीट पाहा, वाचा मी काय म्हटलंय... तोही मोर्चा आमचाच होता, महाराष्ट्राचाच होता. त्यानं आणि कालच्या मोर्चानंही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवली आहे. छत्रपतींनी भाजपच्या नादाला लागू नये. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. ज्यात महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. तसेच जशास तसं उत्तर योग्य त्या मुद्यांवर द्यायला हवं.
हेही वाचा - winter session : 'तो' निर्णय रद्द करा, नागपूरमध्ये शिंदे सरकार दाखल होताच माओवाद्यांचा इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Maharashtra political news, Maratha kranti morcha, Sanjay raut