बीड, 14 सप्टेंबर : गेवराई तालुक्यातील नागझरी इथे युवकाची भर दिवसा हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातल्या तरुण मुलाला अशा प्रकार गमावल्यामुळे मृतदेहावर पडून नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. जुन्या वादातून तरुणाची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय काकासाहेब चव्हाण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. काही अज्ञातांनी त्याची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी तरुणाला तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संजयच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात शोककळा पसरली आहे.
या संपूर्ण प्रकाराची गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली पण अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर संजयचा नेमका खून का झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नागझरी येथील पारदी वस्तीवर ही घटना घडली आहे. याच ठिकाणी दीड महिन्यापूर्वी अशीच किरकोळ भांडणातून एकाची हत्या केली गेली होती. दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
बहिणीवर बलात्कार करण्याच्या तयारीत होता सख्खा भाऊ, असा झाला 'Game Over'
हत्येची एक हृदय विदारक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मर्डरचा अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 6 ऑगस्ट गावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासणीत हे संपूर्ण प्रकरण खुनाचं असल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह 5 जणांना अटक केली आहे. मृतक त्याच्या पत्नीला रोज मारहाण करायचा आणि त्याने बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या वडिलांचीही हत्या केली होती.
मृत व्यक्तीला त्याच्या घरच्यांनीच सुपारी देऊन संपवलं असल्याचं धक्कादायक सत्य पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मृत व्यक्तीची आई आणि बहिण असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलाच्या अशा विचित्र वागण्याला वैतागून त्यांच्या घरच्यांनी सुपारी देऊन त्याची हत्या केली.
इतर बातम्या - भाजप-सेनेच्या 'युती वादा'वर काँग्रेस भाजणार पोळी, आजच्या बैठकीत मोठा निर्णय
अशाप्रकारे पोलिसांना आला कुटुंबावर संशय...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाखालील कालव्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो पप्पू उर्फ सुरेंद्र यदू या व्यक्तीचा असल्याचं समजलं. मृताच्या हातावर एस(S)हे अक्षर गोंदण्यात आलं होतं तर त्याच्या कपड्यांवरून मृताची ओळख पडली. त्यानंतर पोलिसांना कुटुंबावर संशय आला. मेकाहारा रुग्णालयाकडून मिळालेल्या शवविच्छेदन अहवालात डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं कारण सांगितलं आहे. मृताच्या शरीरावरही जखमा झाल्या होत्या.
इतर बातम्या - उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!
पप्पू दारू प्यायचा आणि मारहाण करायचा!
मृत पप्पू यदुला दारूचे व्यसन होते. यानंतर तो पत्नीला मारहाणही करत असे. दारू पिऊन घरी आल्यानंतर पप्पू रोज पत्नीला मारायचा. तिच्यावर रोज अत्याचार सुरू होते अशी माहिती तिने पोलिसांना दिली. तर मेव्हण्यासोबत जाऊन मी पतीची सुपारी दिली असल्याचंही तिने म्हटलं. मृत पप्पूने बहिणीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या - साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची निर्घृण हत्या, पोलिसांना फोनवर पत्नी म्हणते...!
वडिलांचीही केली हत्या
पप्पू यदु हा लहानपणापासूनच भांडण करायचा. सुमारे 12 वर्षांपूर्वी पप्पूचा त्याच्या वडिलांशी एका गोष्टीवरून वाद झाला आणि त्याने त्याला दगडाने ठेचून ठार केलं. यानंतर, त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. सुधारगृहातून परत आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचं लग्न केलं. त्याचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्याची पत्नी माहेरी गेली. यानंतर सात वर्षांपूर्वी पप्पूने दीपा बंजारे नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं आणि ते मोहरंगा इथे राहत होते.
'एकच साहेब पवार साहेब', मुख्यमंत्र्यांचं असं झालं बारामतीत स्वागत, संपूर्ण VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा