हरियाणा, 14 ऑगस्ट : हरियाणाच्या पलवलमधील काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या ड्रायव्हरवर हल्ला केल्याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपली दादागिरी आणि ताकद दाखवण्यासाठी आरोपीने प्रथम जिल्हाध्यक्षांवर हल्ला केला आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुमित्रा चौहान यांनी या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.